Get it on Google Play
Download on the App Store

द पीटर बर्गमन केस

द पीटर बर्गमन केस

हि रोजेस पॉइण्ट बीच स्लीगो आयर्लंड या ठिकाणी १६ जून २००९ रोजी मृत अवस्थेमध्ये सापडलेल्या एका अज्ञात माणसाचे रहस्य आहे. त्या माणसाची खरी ओळख अज्ञात राहिली. विशेष उल्लेख म्हणजे हि केस सिआरन कॅसिडी दिग्दर्शित , पुरस्कार विजेता माहितीपट  'द लास्ट डेज ऑफ पीटर बर्गमन ' या नावाने चित्रपटाचा विषय बनली.
वर्णन
तो माणूस ५५ ते ६० वर्षे वयाचा, गोरा, सडपातळ बांधा असलेला आणि लहान पांढरे केस असलेला दिसून येत होता. त्याचे उच्चारण जर्मानिक होते असे त्याच्या वर्णन केले गेले. त्याने काळ्या रंगाचे लेदर जॅकेट (C & A ब्रांड चे), निळ्या रंगाची पॅंट (C & A ब्रांड ची ) साईझ ५०, काळ्या रंगाचे बूट साईझ ४४, काळ्या रंगाचा लेदर बेल्ट आणि निळ्या रंगाचे पायमोजे असा वेश परिधान केलेला होता.
त्याची उंची 5’10½” होती, केस व्यवस्थितपणे कापलेले, त्वचेचा रंग रापलेला ,  डोळे निळ्या रंगाचे आणि भुवया जाड होत्या. त्याच्या दातांची हि व्यवस्थितपणे निगा राखलेली होती. ज्या पद्धतीने त्याच्या दातांचे ब्रीजिंग, रूट कनाल आणि क्राउन्स होते त्या वरून त्याच्या आयुष्याच्या गेल्या दहा वर्षांपासून ते त्याच स्थितीमध्ये ठेवलेले असावेत हि देसून येत होते. त्याच्या तोंडामध्ये मागच्या बाजूला दातांच्या उजव्या ओळीमध्ये वर एक दात पूर्णपणे सोन्याचा होता आणि खालच्या डाव्या बाजूच्या जबड्यामध्ये गम सोबत चांदी भरलेली होती.
शवविच्छेदन
त्याचे प्रेत किनार्यावरती पंण्याने धुतलेल्या अवस्थेमध्ये सापडलेले होते , शवविच्छेदन मध्ये पाण्यात बुडण्याचे पुरावे दिसून आले. दुस्तपणे काही केल्याची एक हि खूण तिथे नव्हती. शवविच्छेदन हे हि स्पष्ट झाले कि त्याला प्रोटेस्ट ग्रंथींचा धोक्याच्या पातळीचा कर्करोग, हाडांचा ट्युमर होता आणि त्याला पूर्वी हृदयविकाराच्या  झटक्यांचा त्रास झालेला होता. विषचिकित्सा चाचणी मध्ये त्याच्या पचन संस्थेमध्ये त्याने कोणत्याही प्रकारची  वेदनाशामक औषधे किंवा एखादी अस्पिरिन हि घेतल्याची खूण नव्हती. शिवाय आधीपासून च त्याची एक किडनी हि काढून टाकण्यात आलेली होती.

अंत्यविधी

पाच महिन्यांच्या तपास कार्यानंतर त्याचे शव अखेरीस स्लिगो येथे दफन करण्यात आले. चार सुरक्षा रक्षकां त्याच्या अंत्यविधी ला उपस्थित होते.
प्रगती
२०१५ मध्ये , फ्रेंच वृत्तपत्र Le Monde ने त्यांनी ऑस्ट्रियन पोलिसांना या केस च्या संदर्भात संपर्क साधल्याचे वृत्त जाहीर केले, आणि ऑस्ट्रियन पोलिसांनी यावर आयरिश पोलिसांकडून कोणताही संपर्क कधीही साधला न गेल्याचे भाष्य केले. Le Monde ने असा हि अहवाल दिला कि अज्ञात माणसाच्या संदर्भात कोणतीही इंटरपोल सूचना नाही , असे हि निवेदन केले गेले कि वास्तवामध्ये अज्ञात माणसाची ओळख पटली न गेल्यामुळे तो "हरवलेली व्यक्ती " किंवा "हवी असलेली व्यक्ती " या दोन्ही हि सदरांमध्ये बसत नव्हता. हे त्याच्या मूळ देशाच्या प्रती आहे कि त्यांनी त्या माणसाची हरवले असल्याची नोंद करावी.