Get it on Google Play
Download on the App Store

निद्रेतून जाग

निर्मितीचे स्तंभ !

लेखकाची सूचना : निर्मितीचे स्तंभ () हे एका छायाचित्राचे नाव आहे. हबल दुर्बिणीने एप्रिल १, १९९५ रोजी इगल नेबुला मधील धूळ आणि इतर वायुरूप पदार्थांच्या ४ स्तंभांचे छायाचित्र घेतले होते. सदर चित्रातील सर्वांत डावा स्तंभ ४ प्रकाश वर्षे उंच आहे म्हणजे प्रकाशाच्या वेगाने गेले तर एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत जायला ४ वर्षें लागतील. सूर्या पासून पृथ्वी पर्यंत यायला प्रकाश किरणांना ८ मिनिटे लागतात.

—— 

अर्जुन ने डोळे उघडले आणि आपण पाण्यात आहोत ह्याची जाणीव त्याला झाली, पाण्यातून बाहेर येण्यासाठी त्याने हात पाय मारायचा प्रयत्न केला पण त्याचे सर्व शरीर लुळे पडले होते. क्षणभर त्याला भीती वाटली पण पाणी अचानक गायब झाले आणि त्या ऐवजी शरीरावर आधी थोडी गरम हवा आणि नंतर एक सुगंधित पदार्थ शिपडला गेला. "Hibernation Termination प्रोटोकॉल Complete" असा आवाज ऐकू आला आणि अर्जुनला लक्षांत आले कि तो शीतनिद्रेतून जागा होतोय. त्याने उठायचा प्रयत्न केला आणि सर्वप्रथम त्याने समोर ठेवलेले कपडे उचलून परिधान केले. आजूबाजूच्या सर्व गोष्टी तो झोपायला गेला होता तश्याच होत्या. किती वर्षें तो शीतनिद्रेंत होता ह्याची त्याला कल्पना नव्हती.

बाजूच्या कप्प्यांत रेणूचे निद्रागृह होते तिचे डोळे मशीन मधून दिसत होते. "स्वागत आहे कॅप्टन" रोबोट किलो दरवाजा उघडून आंत आला. रोबोट किलो मात्र पूर्णपणे बदलला होता, त्याचा रंग उडाला होता, मुख्य डिस्प्ले वर तडा गेला होता. चाके झिजून गेली होती. जाणून काही मारामारी केली होती असा त्याचा अवतार होता.

"किलो, किती वर्षे झाली मी झोपेत होतो ? आणि तुझी अवस्था अशी की झाली ? " अर्जुन ने त्याला प्रश्न केला.

"सर किती वर्षें आम्ही अंतराळात आहोत हे मोजणे शक्य नाही, आमच्या यानाचे टायमर २४ वेळा रिसेट झाले आहेत, एकूण ३५७ वेळा मला उर्जा स्त्रोत बंद करून चालू करावे लागले त्या शिवाय आकाश गंगेतून बाहेर येताना कदाचित काळ सापेक्षता सुद्धा बदलली असण्याची शक्यता आहे. एकूणच किमान ४० हजार सौर वर्षें तर कमाल ९ लक्ष सौर वर्षें आम्ही ह्या यानात घालवली असण्याची शक्यता आहे ! " किलो सांगत होता आणि अर्जुन च्या चेहेर्यावरील भाव बदलत होते.

"काय ???" अर्जुन ने आधी आपला धक्का सावरण्याचा प्रयत्न केला, नंतर त्याच्या लक्षांत आले कि कदाचित किलो बिघडला असावा. अर्जुना ला स्वतःला सर्व काही कालचीच गोष्ट वाटत होती. भारताचे प्रधान मंत्री, राष्ट्रपती, चीनी बादशाह, आणि दक्षिण कोरियाचे शेवटचे जिवंत मानव सु कि  हे स्वतः निरोप द्यायला श्रीहरीकोटा अंतराळ प्रक्षेपण स्थानकावर आले होते.

२०५२ साली सौरउर्जा प्रकल्प बांधायच्या प्रयत्नांत अरब देशांनी एक बेक्टेरिया तयार केला होता तो सौर उर्जा शोषून वीज निर्माण करत होता. पण तो प्रयत्न हाताबाहेर जावून एक नवीन प्रकारची महामारी जग भर प्रचंड वेगांत पसरली. २०६२ पर्यंत संपूर्ण अरब देश आणि आफ्रिका नामशेष झाली. इतर सर्व देशांनी आपल्या बोर्डर बंद केल्यामुळे व्यापार कमी होवून जगभर सर्वच वस्तूंची टंचाई निर्माण झाली. अमेरिकेत कम्युनिस्ट लोकांनी उठाव करून सर्व औषध कंपन्यांचे सरकारीकरण केले ज्यामुळे सर्व प्रकारचा रिसर्च बंद पडला. नासा बंद करून तो पैसा औषध निर्मितीत घालायचा प्रयत्न अमेरिकन कम्युनिस्ट पार्टीने केला. अमेरिकेशी शेवटचा संपर्क २०६२ साली झाला.

चीन आणि भारत देश त्यांच्या प्रचंड लोकसंख्येमुळे महामारीला तोंड देवून सुद्धा तग धरून होते. अशांत चीनी हवाई कंपनीचे मालक ग्रेस आणि भारतीय अलायन्स इंडस्ट्री चे मालक सोनावाला ह्यांनी मानवजातीला वाचवण्यासाठी शेवटची धडपड करण्याचा पर्यंत केला. कोरियन वैज्ञानिक सु कि ह्यांनी मानवी शरीराला कितीही वर्षे, चीरतारुण्यात  शीत निद्रेंत ठेवणारे मशीन केले होते. पण स्वतः त्या मशीन मध्ये गेल्यानंतर कोरियाशी सर्व देशांचा संपर्क तुटला होता. चीनी बादशाह ने कमांडो टीम पाठवून ते यंत्र हस्तगत केले आणि भारत देशातील शेवटच्या अंतराळ प्रक्षेपण स्थानकातून मानवांना बाहेर पाठविण्याचे प्रयत्न सुरु झाले. २०७५ साल पर्यंत एक विशेष यान बनविण्याचे काम सुरु होते. अलायन्स उद्योग समूहाने ४ फिजन रियेक्टर असलले जबरदस्त यान उल्का तयार केले होते. चीनी बादशाह आणि उद्योगपती ग्रेस ह्यांनी प्रचंड प्रमाणात पैसा आणि इतर साधन सामुग्री उपलब्ध केली होती. सु कि ह्या शेवटच्या जिवंत कोरियन मानवानी आपल्या शीतनिद्रा यंत्र तंत्रज्ञानावर काम करून त्या प्रकारची १६ यंत्रे बनविली होती ४ यंत्रे यान चालविणार्या लोकां साठी तर १२ यंत्रात मानवी स्त्री, पुरुष आणि इतर जनावरांची बीजे रोपित केली होती. किमान २०० वर्षें त्यांना जिंवत ठेवणे सहज शक्य होते.

अर्जुन उल्का यानाचा कप्तान होता. ग्रेस स्वतः सुरक्षा प्रमुख म्हणून बरोबर आला होता तर डॉक्टर रेणू त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार होती. प्रमुख अभियंता म्हणून रामन बरोबर होते.अर्जुन उल्का यानाचा कप्तान होता. ग्रेस स्वतः सुरक्षा प्रमुख म्हणून बरोबर आला होता तर डॉक्टर रेणू त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार होती. प्रमुख अभियंता म्हणून रामन बरोबर होते. खरेतर त्यांच्या पैकी कुणीही ह्या मोहिमे साठी लायक नव्हते. पण महामारीने बहुतेक लोग मारले गेले असल्यामुळे हि जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. नाही म्हणायला अर्जुन थोडा खास होता. महामारीचा कुठलाही असर त्याच्यावर पडला नव्हता. सिक्कीम आणि तिबेट मध्ये तो लहानाचा मोठा झाला होता. सर्व गांव, सर्फ डोंगराळ प्रदेश नामशेष होताना त्याने पहिले होते. पण तो मात्र कसा तरी वाचला होता.

काही संशोधकांनी तर्क  लावला होता कि काही मानव हिं महामारीपासून रोगप्रतिकारक शक्ती घेवूनच जन्माला आले आहेत पण ती शक्ती नेमकी कुठल्या जनुका मुळे होती हा शोध मात्र कुणीच घेवू शकले नव्हते. भारताचे प्रमुख संशोधक नागमणी ह्यांनी अर्जुन ला स्वतःच्या निरीक्षणाखाली ठेवले होते. उल्का यान प्रक्षेपणाच्या ६ दिवस आधी नागमणी महामारीने जे जग सोडून गेले होते.

….

किलो आणि अर्जुन शीतनिद्रा प्रणालीतून बाहेर आले. बाहेर पाय ठेवताच अर्जुनला आणखीन मोठा धक्का बसला, जे यान निघताना इति सुंदर आणि नवीन वाटत होते त्याची रया पूर्ण पाने बदलली होती. भिंतीना असलेल्या पांढर्या रंगाचे फायबरचे वालपेपर कदीच उडून गेल्या प्रमाणे वाटत होते. आतील वायरिंग इत्यादी दिसत होते. लोबी मधून अर्जुन आपल्या नियंत्रण कक्षांत चालत आला. कप्तानाचा नियंत्रण कक्ष खास प्रकारे बनवला गेला होता. कप्तानचे असं इतर पेक्षा उंचावर होते. समोर यान चालकाचे आसन होते. यान चालकाच्या पुढे प्रचंड पारदर्शी स्क्रीन होती ज्यातून यांना बाहेर बघता येणे शक्य होते.

उजव्या बाजूला ग्रेस ची खुर्ची तर डाव्या बाजूला डॉक्टर रेणू ची खुर्ची होती. रामन ला नियंत्रण कक्षांत स्थान नव्हते, त्याचा नियंत्रण कक्ष यानाच्या मागील बाजूला होता. अर्जुनने निरखून बघितले, सर्व प्लास्टीक, फायबर आणि धातूंच्या गोष्टींचा रंग उडालेला होता. काही यंत्रे तर चक्क मोडली होती. असे म्हटले जात होते कि प्लास्टिक नष्ट व्हायला २०० वर्षें लागतात इथे तर हवाबंद जागेत सुद्धा जवळ जवळ सर्व गोष्टी नष्ट होत होत्या. हवाबंद जागेत ह्या प्रकारचा ऱ्हास व्हायला किती वर्षे लागू शकतील हे कदाचित मोजणे सुद्धा शक्य नव्हते.

अर्जुन ने आपला कन्सोल चालू करण्याचा प्रयत्न केला पण काहीही चालू झाले नाही.

"सर काही फायदा नाही" किलोने अर्जुनाला संबोधिले.  "LED डिस्प्ले चे आयुष्य कधीच संपले आहे, त्यामुळे तो चालू होणे शक्य नाही"

अर्जुने भुवया उंचावल्या. त्याचे मन सुन्न झाले. खरोखरच काहीतरी अकल्पनीय घडले होते. उल्का यान ज्या क्षणी कुठल्याची वास्तव्यजोग ग्रहावर पोचले त्या क्षणी अर्जुनला उठवण्याचा आदेश किलो ला होता. ह्याला कदाचित १०० वर्षे लागतील किंवा २०० वर्षें लागतील असा सर्वांचा अंदाज होता, आणि समज असा ग्रह नाही भेटला तर कुठल्या तरी धूमकेतूला आदळून किंवा कुठल्या तरी लघुग्रह पट्ट्यात अडकून यानाचा नाश होयील असा अंदाज होता.

पण सर्वच अंदाज फोल ठरले होते. अर्जुनाला स्वतःला सावरायला वेळ लागला.

"किलो ह्या सर्व काळांत काय काय झाले श्याचा थोडक्यांत वृतांत दे" अर्जुन ने आदेश दिला.

"सर, १०० वर्षे उल्का यान काहीही समस्या नसताना प्रवास करत होते, १०२ वर्षांनी प्रथ्वीवरील संपर्क अचानक तुटला. शेवटच्या माहिती प्रमाणे, प्रथ्वीवर काहीच माणसे जिवंत होती. सुनामी, भूकंप आणि महामारी मुळे श्रीहरीकोटा येथील स्थानकाचा संपर्क बाहेरील जगषित तुटला होता.४ संशोधक आणि त्यांची ३ मुले ह्यांनी शेवटची ४० वर्षे आम्हाला संदेश पाठवले होते, शेवटचा संपर्क झाला तेंव्हा एकाच मुलगा जिवंत होता. "

"त्या नंतर मी यानाला हायीपर वेगांत टाकले आणि आकाशगंगेतील केप्लर २३२ ग्रहाकडे प्रवास सुरु केला. वाटेवर मला २ धूमकेतूंच्या शेपट्या भेटल्या त्यांत दक्षिण गेट च्या भागाला आग लागली. मी ती आटोक्यांत आणली पण पुढे अशी संकटे येवू नयेत म्हणून मी स्वतःला अद्यातांत करण्याचा प्रकल्प हाती घेतला."

"पुढे काय झाले ? " अर्जुनाला आणखीन माहिती हवी होती.

"केप्लर ग्रहाकडे पोचायला ९०० वर्षें लागली. केप्लर ग्रहावर फक्त पाणी होते, मी दुरून गिरत्या घालून पाण्यात काही जीव अवशेष दिसतिल का ह्याचा आढावा घेतला पण काहीही सापडले नाही. उलट प्रचंड मोठ्या लाटा आणि साईनायीड चे प्रमाण वातावरणात मानवी जीवनासाठी पूरक अजिबात नव्हते. म्हणून मी पुढील ग्रहाकडे प्रवास सुरु केला. सुमारे ३००० वर्षे फक्त प्रवास सुरु होता मी ९ ग्रहांची परीक्षा केली पण त्यांचे तापमान एकतर फार होते किंवा अत्यंत कमी होते. "

"३०४५ वर्षांनी LED consoles बंद पडायला लागले म्हणून मी सर्व उपकरणे बंद करायला सुरुवात केली. मला स्वतःला प्रकाशाची गरज नसल्यामुळे सुमारे ३०,००० वर्षांनी मी आज प्रकाश उपकरणे वापरली आहेत” 

"मागील काही वर्षांत मी माझे पार्टस हजारो वेळा बदलले. माझी चाके, वायरिंग इत्यादी झिजून जावू नये म्हणून मी बहुतेक वेळा स्वतःला बंद ठेवायचो. पण अजून पर्यंत थोडक्यांत माहिती द्यायची म्हणजे मी

एकूण ६० सहस्त्र ग्रहांची टेहळणी केली
एकूण ४७ धुमकेतू, ५५२ asteroid बेल्ट्स,३२४ सौर मालिका मी पालथ्या घातल्या आहेत.  त्याशिवाय आम्हाला ठावूक नसलेले अनेक प्रकारचे ग्रह आणि तारे वाटेत आम्हाला भेटले पण कुठेच जीवनाची काहीही चाहूल लागली नाही.”

अर्जुनला सर्वच माहिती समजून घेणे जड जात होती. थोडक्यांत समजायचे म्हणजे त्याची हि मोहीम अपेक्षित कालाहून हजारो पट जास्त चालली होती पण पूर्णतः अपयशी ठरली होती.

पण इतक्यांत त्याला आठवले. "किलो, तुझ्या प्रोग्रामिंग प्रमाणे जीवनाची काहीही संभावना वाटली तरच आम्हाला उठवायचा तुला आदेश होता न ? तू मला आता उठवले आहेस ह्याचा अर्थ आम्ही काही तरी परजीवन शोधले आहे ? "

"तसेच काहीतरी कॅप्टन. आमचे Thrusters कधीच बंद पडले होते त्यामुळे आमच्या वाटचालीची दिशा जास्त बदलणे शक्य नव्हते. आता ३ दिवसांत आम्ही एका कृष्ण ग्रहाकडे पोचणार आहोत, हि आमची शेवटची संधी आहे, मी दिशा बदलून यानाला ग्रहाभोवती परिभ्रमण करण्यास भाग पाडू शकतो, ग्रहावर जीवनाची काहीही शक्यता वाटत नाही पण एका ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची Heat Signature दिसत आहे ती एखाद्या कोमा मध्ये असलेल्या माणसाप्रमाणे वाटत आहे. हा ग्रह जर आम्ही सोडला त्या नंतर पुढील किमान १० हजार वर्षें तरी आणखी काहीही ग्रह, तारे दिसण्याची संभावना नाही. त्याशिवाय म्हजे आयुष्मान आणखीन फारतर १०० वर्षे आहे असे म्हजे अनुमान आहे. त्या नंतर तुम्हाला उठवणे मला शक्य नाही. मागील हजारो वर्षांत this is the closest we have come to finding extra-terrestorial life".



क्रमश: