Get it on Google Play
Download on the App Store

बालाजी माहात्म्य - भाग ३

श्री व्यंकटेश्वर स्वामीचा तिरुपति पर्वतावर स्थिर निवास

श्री व्यंकटेश्वर स्वामीचा तिरुपति पर्वतावर स्थिर निवास
चंद्रकुल तिलक कुरुवंशात उत्पन्न झालेला पंचपांडव व धर्मराजा युधिष्टिर महाराज ह्यांचा स्वर्गवास होताच कलियुगाचा आरंभ झाला.
पंचपांडव आपले जन्मसार्थक करण्याकरीता स्वर्गलोकी गेले. भगवान श्री कृष्ण वैकुंठाला गेले. भूतलावर कलिमहापुरुषांच्या लिलेला प्रारंभ झाला. तपस्वीपणा, ज्ञानीगण, महर्षिगण भूलोकांत होणारा अत्याचार पाहून घाबरुन गेले.
रोजच्या रोज कर्म गतीवर विश्वास वाढला अधर्म फोकावला रामाजाची परिस्थीति खूप बिघडु लागलेली पाहून स्वस्थ बसवेनासे झाले अधर्माचा नाश करण्याकरिता सर्व ऋषिमुनींनी एकत्र होऊन एका महायज्ञा आरंभ केला.
ब्रह्मदेवताची चिंता
अश्या विस्कळीत झालेल्या परिस्थीतीला पाहून ब्रह्माची चिंता अधिक वाढली. आपल्या सृष्टीत निर्माण झालेले अधर्म, गुत्त्द्रोही, असत्यी, लोभी इत्यादी लोकांना पाहून ब्रह्म अत्यंत व्यथित झाले
त्या सुमारास नारद तेथे येऊन पोहोचले ब्रह्मांनी आपल्या मुलांला पाहून विचारले:- “ श्री विष्णु वैकुंठात चांगली झोप घेत आहेत. इथे चाललेला अधर्म अत्याचार ह्यांची त्यांना जाणिवच नाही कोणत्याना कोणत्या तर्‍हेन त्यांना भूलोकात पाचारण करण्यास भाग पाडले पाहिजे काहीतरी उपाय शोधला पाहिजे.
नारद म्हणाले:- “ पिताजी तुम्हीच तर जगाचे अधिपती तुम्च्या हातुन झाले नाही तर आम्हीपण करणार नाही.
परत ब्रह्मानी आपल्या मुलाला आज्ञा दिली:- नारदा ! तुला कोणतेही काम असे नाही की ते तु केलेस आणि झाले नाही तरी तु जाऊन विष्णुला कसेही भूलोकांत आणण्यास परावृत्त कर अवतार धारण कर.
नारदाचा तपोवनात प्रवेश
नारद आपल्या वडिलांची अनुमति घेऊन वीणावादन करु तेथून निघाले. व जेथे ऋषीमुनी तपश्चर्या करीत होते तेथे येऊन पोहोचले. नाणायण, नारायण म्हणणांर्‍या तपोश्रेष्ठ नारादला पाहिल्यावर सर्व ऋषीजन त्याच्यावर संतुष्ट झाला. सर्वजण उठुन त्याचे स्वागत करु लागले. व सर्व तर्‍हेने पाचारण करुन बोलले:- “ हे ब्रह्माच्या मुला तुझ्या आगमनानी तर आम्ही आनंदानी वेडे झालोत. आम्ही लोक कल्याणाकरिता अश्या यज्ञाची योजना करीत आहोत की. त्याची किर्ती टोकाटोका पर्यंत जाईल. व त्याची सफलता नक्कीच आहे. हयात आपली सुद्धा सहाय्यता मिळु दे.
नारदांनी अत्यंत खुष होऊन उत्तर दिले:- हे श्रेष्टमुनिजनों ! आकाशमार्गी मी जात असता आपला आनंद व जल्लोष ऐकून मी येथे आलो आपण लोककल्याणार्थ करीत असलेल्या यज्ञाचे यश नक्कीच आहे. परंतु हे यज्ञफल आपण कोणास अर्पण करणार? हे महान उत्कृष्ट फळ घेणारा कोणी श्रेष्ठ देव असला पाहिजे. ह्या साठी तुम्ही कोणास निवडले आहे?
नारदाचे हे प्रश्न ऐकून ऋषीमुनीना देखील प्रश्न पडला की खरच श्रेष्ठ देवता कोणती आहे? हेयज्ञाचे फळ ब्रह्म, विष्णु, व महेष ह्या तिघापैकी कोणास द्यावे? हे तिघेही सारखेच आहेत कोणी कोणापेक्षां कमी नाही. परंतु यज्ञाचा रिवाज आहे की यज्ञाचे फळ कोणा एकालाच मिळणार.
आपणास पडलेल्या संदेहाचे निराकारण करुन घेण्यासाठी ते सर्वजण ब्रह्मज्ञानी मुनीमध्ये श्रेष्ठ अशा भृगु महर्षीकडे गेले. व त्यांना प्रार्थना केली की आपणच निरनिराळ्या देवतांच्या परिक्षा करुन सर्वश्रेष्ठ अशी देवता कोणती हे आम्हांला सांगा.
सत्यलोकांत भृगुमहर्षी
मग प्रथम भृगुमहर्षी ब्रह्मदेवाकडे गेले. सरस्वती देवी त्यांची सेवा करीत होती. चोहोंकडे वेदाचे स्वर उमटत आहेत. अश्या थाटात चोमुखी ब्रह्मदेव बसलेले पाहून भृगुमहर्षीनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला. पण ब्रह्मदेव अगर इतर कोणीही त्याच्याशी बोलले नाहीत अगर ते आल्याची दखलही कोणी घेतली नाही. तेव्हां ब्रह्मदेव हे अज्ञानीच अत्रएव अपुण्य ठरवुन भृगुमहर्षी ब्रह्मलोकांतुन कैलासास गेले.
त्यांनी जाता जाता ब्रह्माला शाप दिला, की भूलोकात तुझी कुठेही पूजा होणार नाही. म्हणून ब्रह्माच मंदिर असले तरी कुठेही त्याची पूजा होत नाही.
भृगुमहर्षी कलासाला आले. त्यावेळेस कैलास पर्वतावर तिन नेत्र असलेले शंकरही पार्वती बरोबर कामक्रिडा करण्यात रत असलेले त्यांना दिसले.
ते भृगुचे आगमन होत असलेले पाहून पार्वतीने आपणा पासून दूर होण्यास शंकराना विनंती केली व ती आत निघुन गेली. व कामातुर शंकराना क्रोध आवरला नाही. त्यांनी वळुन भृगुमुनीना पाहिले व आपल्या आज्ञाशिवाय आत आलेल्या भृगुना त्रिशूलानी मारण्यास ते उद्युक्त झाले.
परंतु भृगुमहर्षी शंकराच्या क्रोधाला आवर घालण्यासहि म्हणुन त्यांना शाप देऊन चालू लागले. ही देवता परमश्रेष्ठ पदाला प्राप्त नाही असे ठरवून भृगुमहर्षी वैकुठाला विष्णु याच्यांकडे गेले.
श्री विष्णु सुद्धा तसाच होता
शेषशायी भगवान विष्णु हे लक्ष्मीदेवीसह पहुडलेले पहाताच भूगुमहर्षीना संताप अनावर झाला. तो सर्व प्रकार पाहुन खूप वाईट वाटले ह्या तिन्ही देवापैकी एकही श्रेष्ठ नाही. चांगला नाही कोणालाही अतिथीचा आदर करता येत नाही. असे म्हणुन रागाच्या भरात त्यांनी विष्णुचे छातीवर लाथ मारली ऋषिवर्यानी छातीवर लाथ मारली असुन देखील भगवान विष्णुची मनाची शांती ढळली नाही. त्यांनी शांतपणे पाहुन भृगुना विनयपूर्वक व भक्तिभाव पूर्वक प्रणाम केला व अत्कंट लीनतेने विचारले की. माझे अंग देवता मनुष्यमात्रा याना अभेद्य असे आहे. वज्रापेक्षा कठीण अशा माझ्या शरीरास आपल्या अतीशय कोमल पायांनी कशासाठी स्पर्श केलात ? त्यामुळे आपल्या पायांना किती दुख झाले असेल एवढे बोलुन भगवान विष्णुनी भृगुऋषीचें पाये धुतले व त्यांच्या चरण तिर्थाचे प्राशन केले विष्णुचा हा भक्तिभाव पाहून भृगुऋषीना खूप आनंद झाला व भगवान विष्णुच सर्व देवतांत परमश्रेष्ठ अशी देवता आहे. हे त्यांनी भूलोकात येऊन सर्व ऋषीमुनीना सांगीतले.
महालक्ष्मी वैकुंठाहुन निघाली
भृगुमहऋषीनी लाथ मारली असुनही भगवान विष्णुची शांती ढळली नाही. परंतु ते पाहून श्री लक्ष्मीला खुप असह्य झाले. ती विष्णुना म्हणाली “ आपल्या वक्षस्थलावर भृगुऋषीनी लताप्रहार केला आहे. आपले वक्षस्थल हे माझे निवास स्थान आहे आणि तेच लाथेने विटाळले गेले आहे. म्हणुन मी आपला त्याग करुन भूलोकात जाऊन तपश्चर्या करते. म्हणुन श्री लक्ष्मी करवीरपुरास जाऊन राहू लागली.
भगवान विष्णु वारुळात तपश्चर्या करु लागले.
महालक्ष्मी निघून गेल्यामुळे वैकुंठ सुने सुनी वाटू लागले. लक्ष्मीचे अनेक प्रकारे सांत्वन करावे असा विचार करुन त्यांनी पण वैकुंठ सोडुन भूलोकांत जाऊन लक्ष्मीच्या शोधार्थ चारी दिशांना हुडकले. ते गंगातटिपासून दक्षिण दिशेला तिनशे योजने दूर असलेल्या सुवर्णमुखी नावाच्या किनारी असलेल्या वेंकटाचलावर येऊन पोहोचले तेथे त्याच्या मनाला शांती वाटली या वेंकटाचलावर असलेल्या स्वामी पुष्करिणि सरोवराच्या कांठी चिंचेच्या झाडाखाली एक स्वच्छ वारुळ पाहून त्यांनी तीच जागा आपण निवास करण्यास योग्य आहे असे ठरवुन पत्नी विरहाचे दुःख सोसुन त्यांनी तपश्चर्या करण्यास आरंभ केला.
ब्रह्मदेवानी व शंकरानी गाईचे व वासराचे रुप घेतले
भगवंत त्या वारुळात वास्तव्य करायला लागुन बरीच वर्षे लोटली. परंतु देवलोक चिंता करु लागली. शेवटी ब्रह्मदेव व शंकरानी काहीतरी उपाय शोधला पाहिजे म्हणत ब्रह्मदेवांनी गाईचे रुप घेतले व शंकरानी वासराचे व लक्ष्मी गवळण झाली व कसेही करुन भगवंताना आहार मिळाला पाहिजे म्हणुन लक्ष्मीने चोल राजाला गाईला व वासराला विकले. व ती आपले स्थानी परत आली.
आपल्या मुलाच पालन पोषण चांगले व्हावे यासाठी राजाने पुष्कळ दूध देणारी गाय व वासरु विकत घेतले. राजाच्या इतर गाईगुरांच्या बरोबर ही गाय वासरु सुद्धां वेंकटाद्रिवर चरावयास जाई. राजानी ह्या गायीची चांगली निगा ठेवण्यास गुराख्यास आज्ञा दिली. परंतु गुराखी दुपारच्या वेळेस झोपी जात असे.
ते पाहुन एके दिवशी अशीच चरता चरता त्या गाईला स्वामी पुष्करणीच्या कांठी वारुळात भगवंत निवास करीत असताना आढळुन आले. त्यामुळे ती अत्यंत आनंदीत झाली तिला पान्हा फुटला व दुधांच्या धाराचा अभिषेक ती भगवंतावर करु लागली. व तेव्हां पासुन दररोज ती या ठिकाणी येऊन दुधाचा अभिषेक करी.
दैवी गायीचा वारुळावर दुधाचा अभिषेक
त्याचा परिणाम असा झाला की गाय घरी दुध देईनाशी झाली. राजपुत्राला दूध मिळत नाही पाहून राणीने गोपाळास विचारले की गाय दूध का देत नाही? तीला चरायला नेल्यानंतर तु दूध पित असला पाहीजेस. हे नक्की, गोपाळ घाबरुन गेला. व मला काही माहित नाही असे म्हणुन गप्प उभा राहिला
रात्रभर गोपाळला झोप सुद्धा लागली नाही दुसरे दिवशी गोपाळने गाईचे दुध जात तरी कोठे हे पहाण्याकरीता गायीला दावे बांधले व तो तिच्या पाठोपाठ जाऊ लागला. नित्यप्रमाणे वारुळाजवळ येताच गाईने स्तनातील सारे दुध त्यांच्यावर सोडले. हे दृश्य पाहुन गोपाळ क्रोधीत झाला. परतु भगवतास आपणाच गाईचा वध होण्यास कारणीभूत होवू हे ओळखून पटकन त्यांनी वारुळाबाहेर येऊन कुर्‍हाडीचा वार आपल्या डोक्यावर घेतला. कुर्‍हाडीच्या वारांनी भगवंताना खूप मोठी जखम झाली. व त्यामुळे भळभळ रक्त वाहु लागले. ते पाहुन धसक्यानेच गोपाळ मृत्यु पावला.
त्यानंतर ती गाय दुःखीकष्टी होऊन पर्वतावरुन येऊन आपल्या गोठ्याकडे परतु लागली गाईची ती दिनवाणी अवस्था पाहुन राजाने गुराख्याला विचारले ही गाय एकटीच कां परत आली आहे. तीने दुसर्‍या गाईना कोठे सोडले. तिला इतर गाईच्यांकडे घेऊन जा पुन्हा तीला घेऊन परत तो रानांत गेला तेव्हां त्याला वारुळातुन रक्त वाहत असल्याचे दिसले. म्हणुन तो परत राजवाड्यात आला व गोपाळने केलेल्या वारामुळे वारुळातुन रक्त वहात असल्याचे राजाला सांगीतले राजाने समक्ष तो प्रकार पाहिला व आश्चर्यचकित झाला. व त्याला गोपाळचा मृत्यु वारुळातुन रक्त हा कांही मेळ लागला नाही.
भगवंतानी चोलराजास अभिशाप दिला
भगवान श्रीनिवास वारुळ फोडून बाहेर आले. व त्यांनी सर्व गोष्टी चोल राजास सांगीतल्या दुष्ट गोपाळने कुर्‍हाडीने मला मारले त्या निर्दयाने माझे डोके फोडले आहे. त्यानेच मला दुःख झाले आहे. तो मालक विचारपूर्वक काम करीत नाही. त्याच्या स्त्री-पुत्रादिक व नोकरांकडून झालेले काम देखील मालकास अनिष्ट फळदेणारे आहे. म्हणुन त्यानी राजास तू पिशाच्य होशील. म्हणून शाप दिला निरपराधी असुन देखील पिशाच्य योनीत गेलेल्या राजाला भारी दुःख झाले. त्यांने भगवंतास सांगीतले. आपण मला काही न विचारता शाप कशासाठी दिलात. ते एकून भगवंताना वाईट वाटले त्यांनी शाप विमोचना करीता त्यांनी सांगीतले आकाश नावांचा एक राजा होईल तो आपली कन्या पद्मावती हिचा विवाह माझ्याशी करुन देईल तेव्हांच तुला सुखप्राप्ती मिळेल.
वराहमूर्तीची भेट
जेव्हां भगवंत आपल्या जखमेकरीता औषध आणण्या करीता बाहेर पडले तेव्हा वराहमूर्तीनी त्यांना पाहिले. व श्री महाविष्णुची ही दोन रुपे पाहून वराहाला आश्चर्य वाटले. त्यांनी भगवंतास वैकुंठ सोडून इथे येण्याचे कारण विचारले. तेव्हां श्री लक्ष्मीच्या विरहामुळे मी वैकुंठ सोडून इथे आलो. कलीयुग संपेपर्यंत इथेच वास्तव्य करण्याची माझी इच्छा आहे. तरी आपल्या जवळच मला कोठेतरी जागा द्या. जमिनीची किंमत द्या व मग रहा म्हणुन वराहाने सांगीतले. तेव्हां ते म्हणाले तुला देण्यासाठी माझ्याजवळ द्रव्य नाही. प्रथम तुला दर्शन व अभिषेकाचा नैवेद्य मात्र देऊ शकतो.
वराहनी त्याचा स्विकार केला. व भगवंताना शंभर पावले जमीन रहाण्यासाठी म्हणुन दिली. अश्या प्रकारे आपल्या भक्तांना संतुष्ट करण्यासाठी श्री व्यंकटेश भगवान व वराहरुपी भगवान हे दोघेही वास्तव्य करु लागले.
श्री व्यंकटेशाचे वास्तव्य होवू लागल्यानंतर वराहाने आपली दासी बकुलमालिका हिला त्यांच्या सेवेसाठी पाठवून दिले.
पुर्वजन्मी हीच बकुलमालिका श्रीकृष्णाची माता यशोदा होती. श्रीकृष्णाच्या विवाहसोहळा पाहण्याचे सुख तिला या जन्मी काही लाभले नाही. तेव्हां श्रीकृष्णांनी तिला पुढच्या जन्मी तसे सुख देण्याचा वर दिला होता. श्रीकृष्णांनी मग श्रीनिवासांच्या रुपाने जन्म घेतला व माता यशोदा बकुलमालिका म्हणुन जन्मास आली.