Get it on Google Play
Download on the App Store

पहा कसा सजला गणेश गौरीनंदना

पहा कसा सजला गणेश गौरीनंदना ॥धृ॥

पिवळा पिंताबर नेसुनी जरीचा, हिरे मुकुटावरी शोभता राहिला ॥१॥

फुल गुलाबी चमेलीचे आणूनी, सुवास बहु सुटला मधुर चाफा चंदना ॥२॥

दुर्वा हरळी आवड मनाची धूप दिपाचीं आरती करुनी, मोदक फराळ करी खाताना गोडी लागेना ॥३॥

संगे शारदा ब्रह्माकुमारी मोरावरी बसुनी आली गायना ॥४॥

भाद्रपद मासी शुद्ध सप्तमीच्या , दिवशी जानकी नररा मध्ये आनंद गगनात माईना ॥५॥