Get it on Google Play
Download on the App Store

ACP कामत

ACP कामत ह्यांना गोवा पोलिस खात्यात फारच मान होता. चंद्रकला मर्डर केस, गनी खान दहशतवादी चकमक, गोकुळ चीट फंड घोटाळा आणि असंख्य गाजलेल्या प्रकरणात कामतांनी लक्ष घालून सत्य लोकां समोर आणले होते. कामत ह्यांनी अचानक स्वेच्छा निवृत्ती घेतली तेंव्हा सर्वांनाच धक्का बसला होत. कामतांनी कीर्ती चक्र सोडून सर्व मेडल प्राप्त केली होती. लोकांमध्ये त्यांची ख्याती कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक लोकसेवक म्हणून होती. त्यांच्या चारित्र्यावर कसलाही डाग नव्हता.

दोन दशकं मागे गोव्यांत फर्नांडो टोळी आणि राजकुमार टोळी ह्यांनी धुडगूस घातला होता, खंडणी, अपहरण, खून ह्यांचे प्रमाण वाढत होते. ह्याचा परिणाम पर्यटन उद्योगावर होत होता. पोलिस हातावर हात घेवून बसले होते अशातली गोष्ट नव्हती, पण गुन्ह्यांचे प्रमाण एव्हडे वाढत होते कि पोलिस सुद्धा थकत चालले होते. दोन्ही टोळ्यांची गुन्हे करण्याची पद्धत फारच वेगळी होती. छोटे मोठे गुंड पोसण्या ऐवजी फर्नांडो ह्याने taxi चालक व बस चालकांना आपल्या धंद्यात सामील केले होते. खून अपहरण करण्या साठी फर्नांडो बेळगांव हून काही तरुण आणायचा. गुन्हा झाल्या नंतर taxi चालक व बस चालकांच्या मदतीने पैसा आणि गुन्हेगार दोनी राज्य बाहेर जायचे. गोवा पोलिसांना बेळगांव मध्ये जावून तपास करणे कठीण जायचे. प्रमुख गुन्हे म्हणजे खंडणी वसुली व अपहरण.

राजकुमार टोळीची गोष्टच वेगळी होती. राजकुमार म्हणजे कोणी तरुण नसून ७० वर्षांचा एक म्हातारा होता. सडा झोपडपट्टीतून तो आपले गुन्हेगारीचे साम्राज्य चालवायचा. समुद्रातून अमली पदार्थ आणायचे ते एका गुप्त ठिकाणी ठेवायचे व तेथून संपूर्ण गोव्यात लहान मुलां करावी पाठवून विकायचे हा त्याचा मुख्य धंदा होता. अमली पदार्थातून मिळणारा पैसा तो छोट्या मोठ्या धंद्यांत गुंतवायचा. संपूर्ण गोव्यात पेट्रोल पंप, किराणा मालाची दुकाने, खानावळी असे असंख्य सफेद धंदे त्याचे चालू होते आणि वेळी वेळी गुन्हे करण्यासाठी हेच धंदे त्याचा मदतीस येत असत. पोलिसांनी कधी ह्या धंद्या वर धाड टाकली तर पोलिस विनाकारण खानावळी, व्यापारी ह्यांना सतावत आहेत असेच चित्र लोकां समोर येत असे.

अश्या परिस्थितींत कामत हे नवीनच गोव्यांत आले. अवघ्या एका वर्षांत त्यांनी दोन्ही टोळीचे नामोनिशाण मिटवून टाकले. कामतांची काम करण्याची पद्धतच वेगळी होती. उगाच छोट्या मोठ्या गुन्ह्यावर वेळ न दवडता त्यांनी गोव्यातील सर्व बँक खात्यावर नजर ठेवली. काहीच महिन्यात त्यांना लक्षांत आले राजकुमार टोळी आणि फर्नांडो टोळी ह्यांचे गुप्त संगनमत आहे व दोन्ही टोळ्यांचे आर्थिक व्यवहार मुंबईतील गोपाल सहाय नामाचा एक लेखापाल चालवतो. कामतांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने गोपाल सहाय ला जाळ्यांत अडकवले. गोपाल सहाय ह्याचे पाकिस्तानी ISI कडे संबंध होते हे सिद्ध झाले व फर्नांडो टोळी व राजकुमार टोळी ह्यांचा आर्थिक कणा मोडून गेला. CBI ने ह्या प्रकरणात अनेक बँक खाती सील केली. पैश्या अभावी जे तरुण गुन्ह्या कडे वळत होते त्यांचे प्रमाण कमी झाले. शेवटी आर्थिक वैमनस्यातून फर्नांडो ला कुणी तरी गोळी घातली व तो आजतागयात व्हीलचेअर ला खिळून आहे. ह्या यशस्वी कामगिरीची कथा दैनिक गोवा भास्कर ची त्या वेळची संपादिका श्रीमती काव्य केतकर ह्यांनी पुस्तक रूपांत प्रकाशित केली व ACP कामत ह्यांना गोव्यांतील प्रत्येक नागरिक ओळखू लागला.

कामतांच्या निवृत्तीची बातमी दैनिक गोवा भास्कर ने सर्वप्रथम प्रकाशित केली. ताबडतोब कामत राजकारणात येत आहेत अश्या वावड्या उठू लागल्या, कुणी तरी कामत ह्यांचे मुख्यमंत्र्यांशी काही तरी बिनसले आहे असा तीर सोडला, तर काही लोकांनी त्यांचे आरोग्य बरोबर नाही असा निष्कर्ष काढला. सत्य काय ते कधीच पुढे आले नाही. अचानक एक दिवस ACP कामतांनी आपल्या ड्युटी चा निरोप घेतला व काळाच्या विस्मृतीत ते कुठे तरी गडप झाले.

त्यांचा कुठे सत्कार झाला नाही कि त्यांचे नाव कुठे वर्तमान पत्रांत आले नाही. काही लोकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न जरुर केला पण कामतांनी कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीला नम्र पणे नकार देवून त्यांची बोळवण केली. कामतांना निवृत्ती घेवून ४ वर्षें झाली आणि त्या नंतर कुणालाच त्यांची आठवण झाली नाही.

मॄत्योर्माअमॄतं गमय

धर्मराज
Chapters
ACP कामत