तू भ्रमत आहासी वाया
’प्रेम म्हणजे मरण असतं.’मी’ हा शब्द प्रेमात आणि भकतीत उरत नाही.मरणात तेच होतं.ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे,तोच खरं प्रेम करु शकतो.’
’सुर्यप्रकाश वाढू लागला की दंवबिंदू आपोआप नाहीसे होतात.’
’अंधार्या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो.वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो.मग काही काळ चालणं अवघड जातं.म्हणून सांगतो.गुरू शोधू नकोस.चालणं,ठेचकाळणं,रक्तबंबाळ होणं,एकाकी पडणं,दरीत कोसळणं,हे सगळ घडू दे.नियती,प्रारब्ध हे अड्थळे मानू नकोस.ते सौभाग्य आहे.आगीतून जा.कचरा जळून जाईल.सोनं उरेल.प्रेमपुर्तीत साफ़ल्याची शंका असते,प्रेमभंगातलं वैफ़ल्य नवी पायवाट शोधायला लावते,स्वतःच्या मालकीच अनुभव घेणारा प्रत्येकजण वेगळा असतो आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्वं दुसर्याला थेअरी वाटते. कबुतराला गरूडाचे पंख लावता येत नाहीत.कदाचित लावता येतीलही,पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही डणं भोगायचं असतं.हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा,सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी,दुःखाला घर हवं.कारणही हवं. व्यवहाराला गंध नसतो.स्पर्श नसतो.सूर नसतो.गोंगाट असतो.रूचीच नसते मग अभिरूचीची बातच दूर. प्लास्टीक़च्या फ़ुलांना फक्त धुळीचा शाप.सर्फनं धुतली की झालं.पण नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाहीत.जन्म-मरणाचाच फ़ेरा नसेल,तर शहारे-रोमांच,आसक्ती,विरह मिलन,भय,सगळ्यातूनच मुक्ती.जिवंत फ़ुलं स्वाभिमानी असतात.धुळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करतात. निर्माल्य म्हणजे हौतात्म्य. धुळिचा पेहराव म्हणजे अमरता.