तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता!
हा मूळ लेख http://techmr.wordpress.com वर अक्षय सावध यांनी लिहिला असून येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो परवानगीने पुन:प्रकाशित केला आहे.
आजच्या जगात ज्ञान हेच धन आहे. आज ज्याच्या जवळ जास्त माहिती तो जास्त सुरक्षित आहे. त्याच मुळे आज ज्ञानाची किंमतही वाढली आहे. जसे की, कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्या किंवा कोणतेही पुस्तक घ्या, ते फ़ारच महाग झाले आहे. बरेचदा महागाईमुळे आपल्याला आपल्या ज्ञानाच्या भुकेला मुरड घालावी लागते.

जर हे सर्व ज्ञान मोफ़त उपलब्ध झाल्यास किती छान होईल. असाच विचार ’जिमी वेल्स’ यांनी केला व त्यावर कृती सुध्दा केली. त्यातूनच Wikipedia चा जन्म झाला. ज्ञानाचे अपरिमीत भंडार लोकांसाठी खुले झाले, ते पण मोफ़त. आपल्या पेकी बरेच लोकांना याबद्दल माहीती असेल पण Wikipedia बरोबरच Wikimedia या समुहाचे अजुन अनेक प्रकल्प आहेत. ते सुध्दा अनेक भाषेतुन उपलब्ध आहेत. हे सर्व मराठीत सुध्दा उपलब्ध आहे. त्याच बद्दल आपण जाणून घेवू.
