
मलाला (Marathi)
महाकाल
संकटांपासून वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू नका. त्यापेक्षा त्यांचा निर्भयपणे सामना करा -रविंद्रनाथ टैगोर एक दिवस मलाला शाळेच्या व्हॅनमध्ये जात होती तेव्हा एका तालिबानी सैनिकाने मलालावर गोळीबार केला. गोळी तिच्या डोक्याला आणि मानेला चाटून खांद्यात घुसली. त्यानंतर मलालावर अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. अखेरीस इंग्लंडमधील क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल बर्मिंगहॅममध्ये ती बरी झाली. आता मलाला तिच्या कुटुंबासह तिथेच राहते. तिची कहाणी जितकी प्रेरणादायी आहे तितकीच चित्तथरारक आहे.READ ON NEW WEBSITE