Get it on Google Play
Download on the App Store

भूपाळी शंकराची

धवळे भोळे चक्रवर्ती । धवळे अलंकार शोभती ।

धवलें धाम उमापती । सदा चित्तीं चिंतावा ॥ध्रु०॥

धवळ्या जटा गंगाजाळ । धवळा मयंक निर्मळ ।

धवले कुंडलांचा लोळ । शंखमाळ लोंबती ॥१॥

धवळी स्फटिकांची माळ । धवळे गळां उलथे व्याळ ।

धवळें हातीं नर-कपाळ । धवळा त्रिशूळ शोभतसे ॥२॥

धवळा सर्वांगें आपण । धवळें विभूतीचें लेपन ।

धवळें गात्र धवळें वसन । धवळें वाहन नंदीचें ॥३॥

धवळें कैलास भुवन । धवळें मध्यें सिंहासन ।

धवळें शंकराचें ध्यान । दास चिंतन करीतसे ॥४॥

देवांच्या भूपाळ्या

स्तोत्रे
Chapters
भूपाळी श्रीगणपतीची भूपाळी घनश्याम श्रीधराची भूपाळी मारुतीची भूपाळी श्रीकृष्णाची भूपाळी कृष्णाची भूपाळी रामाची भूपाळी पंढरीची पहाटेच्या भूपाळ्या भूपाळी श्रीविष्णूची भूपाळी श्रीविष्णूची भूपाळी आत्मारामाची भूपाळी शंकराची भूपाळी गंगेची भूपाळी नद्यांची भूपाळी दशावतारांची भूपाळी संतांची भूपाळी श्रीदत्तप्रभूची भूपाळी श्रीदत्तप्रभूची भूपाळी श्रीदत्तात्रेयाची भूपाळी श्रीदत्तप्रभूची भूपाळी श्रीदत्तप्रभूची भूपाळी श्रीदत्तप्रभूची भूपाळी श्रीदत्तप्रभूची भूपाळी श्रीदत्तप्रभूची भूपाळी श्रीदत्तप्रभूची भूपाळी श्रीदत्तप्रभूची भूपाळी श्रीदत्तप्रभूची