Get it on Google Play
Download on the App Store

मोदक..!

श्री गजाननाच्या आवडीचा खाद्यपदार्थ एक परंपरा संस्कृती लाभलेला  पदार्थाच्या रेलचेलीत आपलं अग्रमानांकन जपणारा सर्वांना प्रिय असलेला मोदक..

मोद म्हणजे आनंद देणारे ...गणेश ही सदैव प्रसन्न राहणारी देवता आहे.सर्व पूजेच्या अग्रभागी गणेशपूजा केली जाते तसेच त्याला आवडणारा हा मोदक ही सर्व पदार्थाच्या अग्रभागी मान सन्मानाने पदार्थाच्या ओळीत बसणारा गोड पदार्थ.तर क म्हणजे कर्म ...
मोदक मानाचा प्रतीक आहे म्हणूनच त्याला ज्ञानमोदक असे ही म्हणता येईल.

जसं एखाद्या विषयाचे ज्ञान समजून घेताना सुरुवातीला वाटतं की ज्ञान थोडेच आहे, पण अभ्यासाने   समजतं की ज्ञान प्रचंड आहे. अगदी तसंच म्हणता येईल मोदकाचा बाहेरील भाग याचे प्रतीक सारण त्यातील आशय अर्थातच ज्ञानामुळे प्राप्त झालेला आनंदही मोदकासारखं गोड असेच म्हणता येते .

जसे आपल्या संस्कृतीत श्रीफलाला खूप महत्व आहे .किंवा अगदी नैवेद्य म्हणून गूळखोबरेचा आपण वापर करतो तसे  मोदक आणि नारळ यामधे देखील साम्यच आहेच  .मोदकाचा आकार हा  श्रीफलासारखा यावरील कळ्या या अभ्यास, मनन, चिंतन, अवलोकन ,आकलन या ज्ञानसाधनांचे द्योताक असे म्हणूयात  कमीत कमी पाच कळ्यांचा मोदक हवाच ना या आतील गूळखोब-याच्या  सारणाला पातळमऊसर तांदूळ उकडीच्या पारीने संरक्षित करतात. जसे आपले आयुष्य आपल्या संचित कर्माचे फलित या ज्ञानसाधनांनीच संवर्धित होते फुलते बहरते पूर्णत्वास येते म्हणून गणेश सर्वव्यापी असेही म्हणता येते.

परमेश्वराप्रती आपली कल्पकता आणि भक्ती श्रद्धा यांचा सुंदर मिलाप म्हणजे हा मोदक आनंद देवून चवीचा जिव्हाळा जपणारा..

काही ठिकाणी  तळणीचे मोदकही करतात तर कोकणात उकडीचे मोदक अर्थात यात त्या त्या भागात सहज उपलब्ध पदार्थ वापरुन करण्याची परंपरा ओला नारळ जिथं मुबलक उपलब्ध तिथं तशाप्रकारे आतलं सारण बनतं. जिथे ओला नारळ नाही तिथं सुक्या खोबऱ्याचा वापरही केला जातो. भावना तीच आनंद....

मोदकाशी समानता दर्शवणारे मोमोज ही 
 पूर्वेकडील राज्यात प्रचलित पण आतील सारण तिखटमिठाचे असते., नेपाळ, भूतान सिक्कीम, दार्जिलिंग भागात लोकप्रियआहेत

ओरिसा, आसाम आणि बंगालमध्ये तांदुळपिठाच्या उकडीची पातळ पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचं सारण भरतात पीठा नावाने मोदक पदार्थ प्रचलित.

मग असा हा मोदक बाप्पाला का आवडू लागला असेल यामागेही काही पौराणिक आधार असेल ??

अत्री ऋषींची पत्नी अनसूया हिनं आदरभावानं भगवान शंकर, देवी पार्वती आणि श्रीगणेश यांना भोजनास आमंत्रित केलं. विविध प्रकारची पक्वान्नं त्यासाठी सिद्ध केली गेली. पण सर्व भोजन स्वाहा करूनही गणपती बाप्पांची भूक काही भागेना.
अडचणीत सापडलेल्या अनसूयेनं विचार केला की गोड पक्वान्नानं गणपती बाप्पांचं पोट निश्चितच भरेल. तिनं नव्याने पाकसिद्धी करत झटपट एक पदार्थ तयार केला.तर त्या पदार्थाच्या सेवनानंतर बाप्पांचं पोट भरलं. त्यांनी २१ ढेकर देऊन तृप्तीची पोचपावती दिली. तेव्हापासून गणपतीला एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवत असावेत हाच मोदक गणपतीला तृप्तीचे ढेकर देताना पाहून आनंद देणारा म्हणून त्याचे नाव मोदक पडले असावे ,

अशाप्रकारे पुराणकाळापासून मोदकाचा उल्लेख आढळतो पण पाककृती तीच याची खात्री देता येत नाही.

ज्योतिषशास्त्रा सांगते गणेशाला केतु म्हणून ओळखले जाते. केतु एक छाया ग्रह आहे जो राहू  छाया ग्रहाच्या विरुद्ध असतो, ज्ञान आनंद विरोधाशिवाय येत नाही आणि ज्ञानाशिवाय मुक्ति नाही. 

गणेशावर विश्वास ठेवणार्‍यांचा मुख्य हेतू म्हणजे गणेशाला सगळीकडे पाहणे. सर्वत्र पहाणे, जर गणेश हे साधन असेल तर ते जगाच्या प्रत्येक कणात आहे. असेच म्हणावे लागेल जसे शेतीची हिरवाई गणेश तर ते करणारा ही गणेशच. एखाद्या पदार्थातील चव रंग वास म्हणजे गजानन तर ते ग्रहण करणारा ही गजाननच .एखाद्या संकटाची सुरुवात अन् ते हारणाराही तोच विघ्नहर्ता मनुष्याला जगण्याचे गमक दाखवून देणारा विघ्नेश्वर.संकटातून मुक्तीचा आनंदही देणारा त्याचे प्रतिक मोदक ..

नवग्रहांचे बळ गणेश उपासनेने मिळते शुभाशुभ दृष्टीचे फलित देणारा हा मोदमयी मोदक .मोदक आवडणारे गणेशप्रियच ....!

 अशावेळेस डाएट चा विचार न केलेलाच बरा.
1 मोदक साधारण 185cal carbohydratesचे प्रमाण जास्त असते.तत्सम पदार्थ बघता.पण आनंदासाठी एखाद्या चालतोच शेवटी सगळे पोटासाठीच ...!

शिवाय पुन्हा ते 21 कळ्या वैगेरे कमळासाराख्या बनवता येणं ही कलाकुसर उकड जमून येणं हे करणाराचे कौशल्यच सारण जमणं ही  उत्तम पाकनिपुणतेच प्रशस्तिपत्रक मिळण्यासाठी पुरणपोळीसारखेच उकडीचे मोदकही यायला हवे ही प्रथा पूर्वापारची ...आजकाल सहज उपलब्धही..तरी...

कधी कधी न खाताही केवळ बघून तृप्तीचा आनंद देणारा हा मोदक बाप्पाच्या पुढ्यातून आपल्या पुढयात कधी पडेल ही ओढ असतेच ...मग मोदक या शब्दाची सार्थकता चवीला वृद्धींगत करते मग तृप्तीचा ढेकर आनंद च देईल ...इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात मोदक या  पारंपारिक गोड पदार्थाने करुन परंपरातील समतोल साधता येतो हे ही आहेच ....गणेशाची कृपा वर्षभर व सदैव  राहो हीच शुभेच्छा  !!

अशा या तुमच्या -माझ्या मनातल्या मोदकाच्या चवीचा जिव्हाळा  जपण्याचा प्रयत्न...!!

©मधुरा धायगुडे

6

आरती..! ©मधुरा धायगुडे 

आर्त भावनेने देवाला रिझवण्यासाठी केलेली प्रार्थना ती आरती. एखाद्या ठिकाणी उत्सवात आपल्याला भगवंताच्या आरतीचा मान मिळाला असे भारावून संगत असतो. देवतेच्या पूजनात धूप दीप नैवेद्य या प्रमाणे आरतीचा ही उल्लेख आहे. परमेश्वराच्या सगुण रूपाचे  वर्णन त्याचे सौदर्य नकळत आरतीत टिपलेले असरे पूजेला पूर्णत्व आणते आरती.
श्री समर्थ रामदासनी केलेली रचना आरती बाप्पाची. सुखकर्ता दुःखहर्ता. यात गणेशाच्या पूजेचे वर्णन तर आहेच शिवाय साकार रूपाचे वर्णन ही रत्नखाचित फरा, चंदनाची उटी, हिरेजडीत मुकुट, कुकूमकेशर, त्रिनयन, सरळसोंड, चरणी घागरिया, फणीवरबंधन असे मोरयाचे वर्णन येते.

मोरयाच्या  या रूपाचे वैभव पाहणे म्हणजे आरती करणे. हे झाले साकार रूपाचे तर आरतीमध्ये काही बोध ही दडलेला असतो पण मूळ हेतू त्या देवतेची उपासना करणं नव्हे ती होणं त्यासाठी अनुसंधानात राहणं म्हणजे आरती.

सुरुवातच सुखकर्ता दुःखहर्ता सुखाचा कर्ता दुःखाला हरवणारा हरणारा अशा विघ्नेश्वराची केलेली स्तुती. नूरवी पुरवी प्रेम कुरपा जयाची सगळ्यांवर प्रेम करणारी अशा मोरयाला शेंदूरच्या उटीने सजवले आहे. कंठावर वाचारुपी स्वरांचा अधिवास अशा मोरयाचे नुसते दर्शनमात्र घेतले तरी कामना इच्छा ची पूर्ती होते. मग असा हा गजानन रत्नाने मढलेला मस्तकी माणिक धारण केलेला बाप्पा चंदन उटी केशराच्या कुमकुमाने मढलेला सजलेला डोक्यावर हिरेजडीत मुकुट शोभून दिसतो, पायावर नुपूर रुणझूण तात. मस्तक ते चरण नखशिखान्त विलोभनीय मूर्ती मनाला भावते भक्त तल्लीन होवून जातो 

आरती श्रद्धेची जाणीव. सरळसोंड, वक्रतुंड, त्रिनयन असलेला हा बाप्पा पितांबर नेसलेला भक्तांना संकटातून मुक्त करण्यासाठी दासरूपात
हे आरतीचे सार बापाच्या सगुण साकार रुपाला समजून घेणे त्या आधारे निर्गुण प्रगती साधणे याचा मार्ग म्हणजे आरती.आरती आरक्त भावनेने केलेली बाप्पाची स्तुती सुफळ संपूर्ण.

© मधुरा धायगुडे