Get it on Google Play
Download on the App Store

मुलांचे पोशाख

मुलांचे कपडे किंवा पोशाख

माणसासाठी जितके महत्वाचे अन्न असते तितकेच कपडे हि असतात. जसे चुकीच्या अन्नग्रहणाने अपचन होऊ शकतं तसच चुकीचे कपडे लहान मुलांना घातले तर त्यांना अंगावर चट्टे उठू शकतात. त्यांना अनेक त्वचा रोगांना लहान वयातच सामोरे जावे लागते. मागच्या वेळी मी मुलांच्या खुराकाबद्दल सांगितले होते. यावेळी त्यांच्या पेहरावाबद्दल लिहित आहे.

कपडे धारण करण्याचा फायदा म्हणजे माणसाचे शरीर थंडी, ऊन, पाऊस या अतिरेकांपासून सुरक्षित राहते. मुलांसाठी कपडे विकत घेताना किंवा शिवून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मुलांचा पेहराव सैल असावा जेणेकरून वारा नेहमी अंगात खेळतो आणि घाम लवकर सुकतो. घाम सुकल्याने मुलाला त्वचा रोगाचा त्रास होत नाही. ओले किंवा घामेजलेले कपडे मुलांनी फार काळ अंगावर ठेवले तर त्यांना अंगाला खाज येऊ शकते.

जड, जाड किंवा घट्ट कपडे परिधान केल्याने मुलांची वाढ खुंटते. असा पोशाख घातल्याने रक्ताच्या मुक्त प्रवाहात अडथळा निर्माण होण्याची संभावना असते. कधीकधी श्वास घेणे देखील कठीण होते. बहुतेक कपड्यांमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या नाड्या, फिती असतात त्यामुळे मुलांना कधी कधी त्या फिती किंवा नाड्या असलेल्या त्वचेला लागून खाज सुटण्याची भीती असते. हे अपाय लक्षात घेऊन अशा सवयी सोडून द्याव्यात. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी लहान मुलांचे हाल करून काही उपयोग नाही.

मुलांना भडक आणि इतरांच्या डोळ्यांना विस्फारून टाकणारे विचित्र रंगाचे कपडे कधीही घालायला देऊ नयेत. मुलांना हलक्या आणि फिकट रंगाचे कपडे घालावेत. मुलांचे कपडे हे नेहमी आपल्या कपड्यांपेक्षा अधिक स्वच्छ असावेत. स्वच्छ कपडे घालणारी मुल हि निरोगी आणि सुधृड राहतात.

 

मुलांचे पोशाख

सखी
Chapters
मुलांचे पोशाख