A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/tmp/ci_session57sad6sfp4j8tomu5iaecge5vfcjcjq0): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 172

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 316
Function: require_once

टाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग | प्रकरण ६| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories

Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

प्रकरण ६

काही वेळ चालल्यावर अचानक अभिजीतला काही आवाज ऐकू आले. तो आवाजाच्या दिशेने निघाला. अभिजीत जसजसा पुढे जात होता, तसतसे ते जंगल दाट होत होते. ते आवाज आता जास्तच यायला लागले होते आणि अचानक अभिजीत त्या जागेवर येऊन पोहोचला. त्याच्या समोर एक आदिवासीसारख्या माणसांचा कबिला होता. पण त्यांचा पेहराव हा भारतीय आदिवासींसारखा अजिबात नव्हता. असं वाटत होतं, कि ते लोक सध्याच्या टेक्नोलॉजी पासून हजारो वर्ष दूर होते. अभिजीत हळूहळू पुढे गेला. ते लोक नाचत होते आणि त्यांच्या विचित्र भाषेत विचित्र आवाज काढत होते. अभिजीतने आजुबाजुला पाहिल आणि त्याला धक्का बसला. त्याच्या बाजूला काही अंतरावर प्रोफेसरांना एका झाडाला बांधलेलं होतं. त्यांच्या समोर आग जळत होती. अभिजीतला समजायला वेळ लागला नाही कि इथे बळी देण्याची तयारी चालू आहे आणि बळीचा बकरा प्रोफेसरांना बनवलं आहे. त्याला आता लवकरात लवकर काहीतरी करणं भाग होतं. तो चुपचाप प्रोफेसरांजवळ आला. अभिजीतला पाहून प्रोफेसरांच्या जीवात जीव आला. अभिजीतने प्रोफेसरांना त्या झाडापासून मुक्त केलं. पण अचानक एका विचित्र माणसाची नजर त्या दोघांवर पडली. त्याने ओरडून आपल्या साथीदारांना सावध केलं. अभिजीत प्रोफेसरांना पुढे पळाला. ते माणसे दगडी हत्यारे घेऊन त्यांचा पाठलाग करत होते. जंगलातील झाडाझुडुपांमध्ये पळताना त्या दोघांना थोडी अडचण होत होती. ते माणसे आता त्यांच्या जवळ येत होते. अभिजीत आणि प्रोफेसर पळत पळत एका जंगलाच्या बाहेर आले. जंगलाच्या बाहेर आल्याने माणसांनी सुध्दा त्यांचा पाठलाग सोडून दिला होता. अभिजीत आणि प्रोफेसर पळून पळून दमले होते. आता त्यांना टाईम मशीनचा रस्ता सापडण जवळपास अशक्य होतं.

"अरे बापरे, केवढे भयानक लोक होते ते." प्रोफेसर धापा टाकत म्हणाले.

अभिजीत: पण नेमके ते लोक होते कोण?

प्रोफेसर: माहीत नाही. पण जुन्या काळातील आदिवासींसारखे दिसत होते.

अभिजीत: कदाचित टाईम मशीन आपल्याला काही वर्ष मागे भूतकाळात घेऊन आली आहे.

प्रोफेसर: हं. टाईम मशीन अजुनही पूर्ण तयार नव्हती. आपण घाई केली. आता टाईम मशीनला रीसेट करावं लागेल. पण त्यासाठी आपल्याला मशीनपर्यंत पोहोचाव लागेल आणि जेवढ मला माहित आहे आपण रस्ता चुकलो आहोत.

अभिजीत: पण मग प्रोफेसर, आता आपण परत कसं जायचं?

प्रोफेसर: माझ्यामते आपण कमीत कमी ५०० वर्ष भूतकाळात आलेलो असु शकतो. म्हणजे १५व्या-१६व्या शतकात.

अभिजीत: पण हे तुम्ही कसं सांगू शकता?

प्रोफेसर: कारण, ज्या माणसांना आता आपण बघितल, ती माणसे जवळपास ५००-६०० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती आणि आणखी एक गोष्ट आपण भारतापासून अगदीच दूर कुठल्यातरी देशात आलोय. कारण मागच्या हजार वर्षांच्या भारतीय इतिहासात अश्या प्रकारची मानवी प्रजाती आढळत नाही‌.

प्रोफेसर: अभिजीत, माझं एक स्वप्न होतं, कि आपला जो मानवी इतिहास आहे, त्याच खरं रूप समोर आणणं. त्यासाठीच गेली २२ वर्षे मी टाईम मशीन साठी खर्ची घातले.

अभिजीत: तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय प्रोफेसर?

प्रोफेसर:मला हेच म्हणायचंय कि आपली सुरूवात आपल्याला हवी तशी झालेली नाही. पण तरी टाईम मशीनने आपल्याला इथे आणून सोडलय. तर मग आपण या जागेला एक्सप्लोर करू शकतो. नाही का? बघू तरी नियतीच्या मनात काय आहे ते?

अभिजीत: पण प्रोफेसर, यात खूप रिस्क आहे. एकतर आपल्याला ही जागा कोणती आहे, हा काळ कोणता आहे  ते माहीत नाही आणि आपली पहिली प्रायोरिटी ही टाईम मशीन शोधणं असायला हवी. तिच्या शिवाय आपण आपल्या काळात जाऊ शकणार नाही.

प्रोफेसर: करेक्ट आहे. एकदम बरोबर बोललास. पण काय आहे ना अभिजीत, आपण भूतकाळात आलो आहोत. आता पर्यंत इतिहास हा फक्त पुस्तकात वाचत आलो आहोत. आज पहील्यांदाच आपण खरा इतिहास पाहू शकतो. भूतकाळात नेमकं काय घडलं होतं, ते अनुभवू शकतो. डोन्ट यू थिंक हे इंटरेस्टिंग असेल? आणि राहिली टाईम मशीनची गोष्ट तर ती आपण शोधूच त्यात काही वाद नाही. अभिजीत, प्रत्येक वाईटातून काहीतरी चांगलं निघत. आपण फक्त दृष्टिकोन बदलायला हवा आणि असंही टाईम मशीन आपण याच कारणासाठी बनवली होती. नाही का?

अभिजीत: प्रोफेसर, वाईटातही चांगलं शोधणं कोणी तुमच्याकडून शिकावं. ठिक आहे. चला. लेट्स एक्सप्लोर.

आणि ते निघाले भूतकाळाला एक्सप्लोर करायला. मात्र त्यांना या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती की हजारो वर्षांपासूनचं न उलगडलेल एक भलंमोठं रहस्य त्यांची वाट पाहत होत‌.... 

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_write_close(): Failed to write session data (user). Please verify that the current setting of session.save_path is correct (/tmp)

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: