Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

अवतार सूर्यवंशीं दिव्य घे...

अवतार सूर्यवंशीं दिव्य घेतला स्वामी । एकपत्‍नी व्रत करुनि राहिला नेमी ।

मर्दिलें ताटिकेसी सुख वाटलें भूमी । रक्षोनी यज्ञ केला कीर्ति प्रख्यात नामीं ॥१॥

जयदेवा रघुनाथा जय जानकीकांता । आरती ओंवाळीन तुजलागीं समर्था ॥२॥

विदेही राजयानें पण केलासे भारी । तें शिवचाप मोठें मोडुनियां सत्वरीं ।

वरिलें जानकीसी आदिशक्ति सुंदरी । जिंकुनी भार्गवाला बहु दाविली परी ॥३॥

पाळोनी पितृवाक्य मग सेविलें वन । हिंडतां पादचारी मुक्त तृण पाषाण ।

मर्दिले दुष्ट भारी दैत्य खरदूषण । तोषले सर्व ऋषि त्यांसि दिलें दर्शन ॥४॥

जानकी लक्ष्मणासहित चालतां त्वरें । भेटली भिल्लटी ती तिचीं उच्छिष्ट बोरें ।

भक्षुनी उद्धरिले कबंधादि अपार । देखिली पंचवटी तेथें केला विहार ॥५॥

पातली शूर्पणखा तिचें छेदिलें नाक । जाउनी रावणासी सांगे सकळ दुःख ।

तेथोनी पातला तो मायामारीच देख । पाहतां जानकीसी तेव्हां वाटलें सुख ॥६॥

तें चर्म आणावया राम धांवतां मागें । रावणें जानकीसी नेलें लंकेसी वेगें ।

मागुता राम येतां सीता न दिसे चांग । तें दुःख ठाकुनियां हृदय झालें भंग ॥७॥

धुंडितां जानकीसी कपि भेटला त्यांसी । सुग्रीव भक्त केला मारुनियां वाळीसी ।

मेळविली कपिसेना शुद्धि मांडिली कैसी । मारुती पाठविला वेगेंकरुनी लंकेसी ॥८॥

मारिला आखया तो जंबुमाळी उत्पात । जाळिली हेमपुरी बहु केला निःपात ।

घेउनी शुद्धि आला बळी थोर हनुमंत । सांगता सुखवार्ता मन निवालें तेथ ॥९॥

तारिले सिंधुपोटीं महापर्वत कोटी। सुवेळा शिखरासी आले राम जगजेठी ।

मांडिलें युद्ध मोठें वधी राक्षस कोटी । रावण कुंभकर्ण क्षणामाजी निवटी ॥१०॥

करुनी चिरंजीव बिभीषण जो भक्त । दिधलें राज्य लंका झाली कीर्ति विख्यात ।

देखोनी जानकीला सुखी झाले रघुनाथ । तेहतीस कोटी देव जयजयकारें गर्जत ॥११॥

पुष्पकारुढ झाले अंकीं जानकी भाजा । येतांचि भेटला भरत बंधु वोजा ।

वाजती घोष नाना गुढया उभविल्या ध्वजा । अयोध्येलागीं आला राम त्रैलोक्यराजा ॥१२॥

पट्टाभिषेक केला देव सेविती पाय । चिंतितां नाम ज्याचें दूर होती अपाय ।

उत्सव थोर झाला वाचे वर्णितां नये । तन्मय दास तुका उभा कीर्तनीं राहे ॥१३॥

संत तुकाराम अभंग - संग्रह ३

सुहास
Chapters
नायकावे कानीं तयाचे ते बो...
गळां घालोनियां माळा । केल...
मुख बांधुनि मेंढा मारा । ...
स्वार्थ परमार्थ संपादिले ...
मखरा लाउनी बेगड । आंत मां...
सांगतों या लोकां रांडा पु...
ज्ञानराज माझा योग्यांची म...
आवडीचा हेवा सांगतों मी दे...
भोजन सारिलें आर्त न समाये...
कां कोणी न म्हणे पंढरीची ...
झालिया निःशंक फिटला कांसो...
तनमन माझें गोविंदाचे पायी...
वेधियेलें मन विसरलें देह ...
हंसूं रुसूं आतां वाढवूं आ...
जोडोनियां कर । उभा राहिलो...
नामाचिया बळें कैवल्यसाधन ...
पताकांचे भार मृदंगांचे घो...
गेलियाची हळहळ कोणी । नका ...
विमानांचे घोष वाजती असंख्...
माडयावरुतें पांजलें शरीर ...
शुद्ध बोजा धान्य आडसुनी ...
जीवीं जीवा मिठी देऊं । का...
यासी भांडावें तें तोंडें ...
आम्ही गोंधळी गोंधळी । गोव...
धन्य झाली भेटी । नाचुं वा...
उंच नारी दीर्घ भारी दादले...
तीन माचवीं चार गाते त्याव...
स्वप्न सांगे मंडोदरी । लं...
तीन शिरें सहा हात । तया म...
नमन माझें गुरुराया । महार...
शरण शरण एकनाथा । चरणीं म...
विठ्ठल जीवाचा सांगाती । व...
वेद उद्भवे त्रिकांड । कंब...
धन्य धन्य देवी गीता । आदि...
आहे भगवद्गीता । पूर्ण अमृ...
खेळ ग फुगडी फुगडी । नको ...
आपुल्या आवडी । उभा दोन्ही...
अवतार सूर्यवंशीं दिव्य घे...
मंडित चतुर्भुज दिव्य कर्ण...
कौतुकाची वाणी बोलूं तुज ल...
मानो न मानो तुज माझें हें...
नाम गाईन मी कथा । निजरंगी...
कपिकुळीं हनुमंत । तया माझ...
भक्तीचें तें सुख नेणवे आण...
जाणें येणें हे उपाधि । ऐस...
प्रेमपान्हा आणि सदा सर्वक...
येथें आड यावें कांहीं । त...
ब्रम्हांडनायक त्याचा मी अ...
आम्हासी आपुलें नावडे संचि...
बोलविला देह आपुलेनी हातें...
हा रस आनंदाचा । घोष काला ...
स्वमुखें जी तुम्ही सांगा ...
तरटापुढें बरें नाचे । सुस...
आठ प्रहर माता । वाहे वेडि...
फुगडी घालितां उघडी राहें ...
तुज नाम नाहीं । तरी माझें...
आगी लागो जाणपणा । आड न यो...
गेला तरी सुखें जावो नरकास...
असो वाट पाहें कांहीं निरो...
करावी ते बोंब । आतां वाडव...
सोसें सोस वाढे । हिंमतीचे...
आतां जागें रे भाई जागें र...
पहुडविले जन मन झालें निश्...
माचे गाण माझा जवळील ठाव ।...
कर्मभूमी उत्तम ठाव । साहे...
माझा दंड पायां पडणें । हे...
भोजनेंचि जालें । मग जीवाच...
प्रेमभेटी आलिंगन । मग चरण...
जियावें हीनपणें । कासयाच्...
नाहीं एसें गांठी पुण्य । ...
जे या धाले ब्रह्मानंदें ।...
धन्य संवसारीं । दयावंत जे...
हें आम्हा सकळ । तुझ्या ना...
बहु गर्भवासीं । सोसें मेल...
लेवविला तैसा शोभे अलंकार ...
नाहीं कोठें अधिकार । गेले...
झेडुग्याचे आळां अवघीं चिप...
अहो उभें या विठेवरी । भरो...
आमच्या कपाळें तुज ऐसी बुद...
गाइन तुझें नाम ध्याइन तुझ...
जालों नवसांचीं । आम्ही तु...
एक नेणतां नाडलीं । एकां ज...
ऐसें आणिक कोठें सांगा । प...
अवधींच कैशीं जालींत कठीण ...
पाहें पांडुरंगा मज तुझी आ...
सकळ कल्याण तूं माझे अंतरी...
आतां माझे हातीं देईं माझे...
आचरावे दोष हें आम्हा ...
कैसें म्या पहावें एकतत्व ...
पहुडले जन विवळली राती । च...
पाहिजे तें आतां प्रमाण प्...
मायाबापापुढें बाळकाचा घात...