Get it on Google Play
Download on the App Store

श्री गजानन महाराज परिचय

संत श्री गजानन महाराजांना भगवान दत्तात्रेयचे तिसरे रूप मानले जाते, आधीचे दोन रूप म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साई बाबा, महाराजांचे सर्वप्रथम दर्शन शेगाव मध्ये २३ फेब्रुवारी १८७८ रोजी झाले, महारांच्या जन्माचा कुठलाही पुरावा नाही म्हणून २३ फेब्रुवारीला महाराजांचा प्रगट दिन म्हणून साजरा केल्या जातो. गजानन महाराज परमज्ञानी, अध्यात्मिक, महान योगी आहेत.

महाराजांनी या भूतलावर अवघे ३२ वर्ष वास्तव्य केले आणि यादरम्यान त्यांनी आपल्या अनन्य लीला दाखवून भक्तांना जीवन संपन्न केले. महाराज हे अवलिया संत आहेत तरी स्वच्छताबद्द आहेत. महाराजांनी भक्तांना रोगमुक्त आणि भयमुक्त केले, भूतबाधा निमावल्या, गरिबांनाही धन्य केले, तसेच कुत्सितांचे अज्ञान दूर केले आणि दाम्भिकांना धडा शिकवला.

मानवतेला सदाचार संपन्न करून महाराज ८ सप्टेंबर १९१० ला समाधिस्त झाले. तत्पूर्वी दोन वर्ष आधीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सुचित केली होती आणि उपदेश केला की मी नेहमी इथेच राहिल.