Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

माझं व्यक्तीगत अनुभव

शाळेतील अनुभव
कल्पना भुतकर
मी आठवी वर्गात शिकत असताना आमच्या गावात नविन पोलिस निरीक्षक म्हणून पोलिस ठाण्यात रुजू झाला त्याच्या बरोबर त्यांची फॅमिली पण पोलिस लाइन मध्ये आली होती त्यांची मुलगी कल्पना ही पण आली होती तिला आमच्या वर्गात नाव टाकण्यात आले होते ती दिसायला साधारणच होती उंची कमी होती रंग गव्हाळ वर्ण होता केंस कुरळे होते डोळे मोठे गुबगुबीत होते मला शाळेत जीना चढण्यासाठी पाय-या वर माझं मित्र हात लावून मला वर चढवत असत कधी कधी शाळेचं शिपाई आणि सर सुद्धा हात लावून मला वर चढवत असत एक दिवस मला हात देण्यासाठी इथे कोणीच नव्हते एका बाजूला चार पाच मुली उभ्या होत्या त्या मध्ये ती कल्पना पण होती तिने मला पाहिले आणि चक्क ती पुढे येऊन मला हात लावून मला वर चढवले असे चार पाच वेळा तिनं मला हात दिला होता आता आमची चांगली ओळख झाली होती आम्हाला शाळेत ग्रंथालयातून गोष्टीची पुस्तके मिळत असत मी माझं पुस्तक वाचून झाल्यावर मी परत जमा करून टाकत होतो असे मी चार वेळा जमा केले पाचव्यांदा जमा करण्यासाठी गेलो असता तिथे कल्पना भेटली तिनं मला विचारले की तुमचं पुस्तक वाचून झाले वाटते मग माझं पुस्तक तुम्हाला देतं आणि तुमचं पुस्तक मला दर्या असे पाच सहा वेळा झाले आता आमची चांगली गट्टी जमली होती मुलं मला चिडवत होते अरे बाबा ती तुझ्यावर प्रेम करीत आहे ना तु तिला एखादी चिठ्ठी लिहून दे मित्रांनी मला एकदम वेडे करुन सोडले होते त्या विचारात मी एक चिठ्ठी लिहून तिला दिली दुसऱ्या दिवशी ती माझ्या कडे बघत सुद्धा नव्हती असे एक आठवडा गेला एक दिवस तिच्या एका मैत्रिणीने मला सांगितले की ती मला भाऊ मानत होती मला एकदम पच्चाताप झाला दुसऱ्या दिवशी मी तिची माफी मागितली आणि तिला सांगितले की मी तुला बहिण मानतो आहे तेव्हा पासून आम्ही दोघे बहिणभावा सारखं वागलो आम्ही दहावी पर्यंत एकत्र होतो नंतर तिची सातारा येथे बदली झाली आणि मी पण आमचं गाव सोडून मुंबई स्थाई झालो होतो हा जीवनाचा अनुभव आला होता