Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

काकड आरती स्वामी श्रीगुरु...

काकड आरती स्वामी श्रीगुरुदत्ता ।

सद‌भावें ओवाळूं चिन्मयरुप अवधूता ॥ध्रु०॥

प्राणापान समान व्यान उदान मिलाले ।

सुषुम्णेचे मार्गें दर्शनासि पातले ॥१॥

सोऽहं शब्दध्वनि मिळोनि सर्वांनी केला ।

दशनादाचा घोष अखंडित चालिला ॥२॥

कुंडलिनीचा वेढा काढुनि काकडा केला ।

सत्रावीचें धृत घेउनी पूर्ण भिजवीला ॥३॥

सद्‌गुरु वाक्याचा चिन्मय प्रकाश पडला ।

निश्चय काकडा नेऊनि तेथें पेटविला ॥४॥

निरंजन ओवाळूं जातां तद्रूप झाला ।

सद्‌गुरुप्रसादें अहंभाव निमाला ॥५॥