Get it on Google Play
Download on the App Store

शिव मनभ्रमर कमलिनी ज...

शिव मनभ्रमर कमलिनी जय आदीशक्ती ।
षण्मुखगज मुखनती जय जय अव्यक्ती ॥
भवगद मेषजलतिके दासप्रिय भक्ति ।
रचत मसत्वां न कळे अगम्य तव शक्ति ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय जय श्रीअंबे ॥
ओवाळूं आरती तुज भावे जगदंबे ॥ धृ. ॥
मोठा दुष्ट महीतळिं महिषासुर झाला ।
फोडुनि निर्जरप्रतिमा त्रासवि विप्राला ॥
भोगित सुंदर स्वबळे नृपतींच्या बाळा ।
हरिहरब्रह्मा पाहुनि पळताती ज्याला ॥ जय. ॥ २ ॥
त्रासविले गोब्राह्मण हे तुजला कळलें ।
तत्क्षणिं भक्त हितास्तव प्रेंमळ मन वळलें ॥
अरिचमुमंडळ भडभड तव क्रोध जळलें ।
चरणतळें महिषासुर घुंगरडें माळिलें ॥ जय. ॥ ३ ॥
होउनि विजयी निर्जर स्थापियले स्वपदा ।
ऎसी तूं निजदासा नेसी दिव्य पदा ॥
अनन्य चिंतुनी तुजला गाती नित्य पदा ।
दास म्हणे त्यां विपत्ति बाधेनास कदा ॥ जय. ॥ ४ ॥

देवी आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
दुर्गे दुर्घट भारी तुजविण... करवीरपुरवासिनी सुरवरमुनिम... आश्विनशुद्धपक्षी अंबा बैस... जय देवी श्रीदेवी माते । व... जय देवी हरितालिके। सखी पा... जय देवी जगदंबे । संकट देव... अंबे प्रार्थितसें तुजला म... आद्यस्थान तुझे करविरपुर म... आनंदे उदो बोलणें भवानीचा ... जय जय निजादिमाता श्रीलक्ष... मी तूं विरहित हें तूं तें... भूकैलासा ऎसी हे केवल... चित्कळा चिदपा चिच्छक्ती व... अजुनी अंत माते किती पाहसी... आई सगुण हेंचीं ब्रह्... मूळपीठ यमुनागारी । म... ॐ नमो आद्यरूपें । दे... अर्णवसमिप दक्षिणे भा... श्री शारदीय अश्विन-च... सुखसदने शशिवदने अंबे... सौम्यशब्दे उदोकारे व... शिव मनभ्रमर कमलिनी ज... मारुनि कोल्हासुर दैत्य दत्तात्... आवाहन ध्यान निवेदुनि आसन ... हंसाग्रि श्रीचंद्रे रंभाव... भक्ती प्रेमें करुनी आरती ... तुझें स्वरुप पाहता मन माझ... स्वेच्छे ब्रह्म तुं स्फुर... श्वासोच्छ्‌वास अवघा तुझिय... सद्‌गुरु सदय द्विदळी वसतो... जय जयवो जगदंबा अंबा सप्तश... जय जय मायभवानी अंबा तुळजा... स्वेच्छे ब्रह्म तूं कौतुकनट क... उदधीलहरीसि तरंगे । ... जयजय भगवति रुक्मिणि ... कामक्रोधदिक वैरी धूप... दशनख चंद्रालंकृत कोम... यर्हि न सन्नासदपि स्... निर्गुणधामी निर्विकल... चतुराननभयहारिणि भो द... कवण अपराधास्तव जननी ... ओंवाळू आरती । महामाय... वरदे रुचिराधरबिंबे ।... आरती त्रिजगदंबिकेची ... श्रीपति तुझीया योगें... जयति जयति जगदंबे महा... जगतारिणी दु : खहारिण... दक्षिणदेशामाजि एक म्... मंगळागौरी नाम तुझे ।... नसतां मारुत पावक जल ... हर अर्धांगी वससी । ज... जय देवी मंगळागौरी । ... निर्गुण जे होते ते स... जय देवी आद्यरूपे भुव... आरती जनन्मोहिनीची सग... करवीरालय वासिनि मंगल... कोल्हापुरी देवी तूं ... सुरवरदायिनी मुरहरसुख... विडा घ्याहो अंबाबाई ... ओवाळीन वोजा ॥ शिवसहज... जय देवी जय जय दुर्गे... महिषासुरमर्दिनि देवि... जय जय आरती त्रिभुवनम... जय देवी विष्णुकांते ... जय देवी जय देवी जय म... महालक्ष्मी करविर क्ष... शिवयन भ्रमर कमळिणी ज... अनादि आदि माया ब्राह... जय जय दुर्गे माते शा... जय जय परमानंदे महामा... जय जगदंबे सुखकर अंबे... शेजारति ओंवाळूं उन्म... जय देवी जय देवी जय म... दुर्गे अघसंकट दुर्गे... जय जय दीनदयाळे शांते... जय देवी जय देवी जय आ... ओंवाळूं ओंवाळूं आरती... जय अंबे जगदंबे जय जय महाक... आरती ब्रह्मकुमारीला श्री अन्नपूर्णे देवी जयजय... जय देवी श्रीदेवी माते । व... येई हो एकवीरा देवी माझे म... चल चल सखे पुजना । हस्ताश... जय देवी मंगळागौरी । सुव... मागू शाश्वत सौभाग्याप्रति... ओवाळू आरतीला मंगळागौरी तु... सुंदरसावळी तुकुबाई संतांच...