Get it on Google Play
Download on the App Store

साई बाबांची वचने

शिरडीस ज्याचे लागतील पाय।।
टळती अपाय सर्व त्याचे।।1।।

माझ्या समाधीची पायरी चढ़ेल।।
दुख है हरेल सर्व त्याचे।।2।।

जरी हे शरी गेलो मी टाकून।।
तरी मी धांवेन भक्तांसाठी।।3।।

नवसास माझी पावेल समाधी।।
धरा दृढ़ बुद्धि माइया ठायी।।4।।

नित्य मी जिवंत जाणा हेंची सत्य।।
नित्य घ्या प्रचीत अनुभवें।।5।।

शरण मज आला आणि वाया गेला।।
दाखला दाखवा ऐसा कोणी।।6।।

जो जो मज भजे जैशा जैशा भवें।।
तैसा तैसा पावें मीही त्यासी।।7।।

तुमचा मी भार वाहीन सर्वथा।।
नव्हे हें अन्यथा वचन माझे।।8।।

जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस।।
मागे जे जे त्यास ते ते लाभे।।9।।

माझा जो जाहला काया-वाचा-मनीं।।
तयाचा मी ऋणी सर्वकाळ।।10।।

साईं म्हणें तोचि, तोचि झाला धन्य।।
झाला जो अनन्य माइया पायी।।11।।