Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

चुकीची जाहिरातबाजी


पाश्चात्त्य खाद्यान्ने, फळे, भाज्या या अधिक पोषकतत्त्वे असलेल्या आणि आरोग्यकारक असतात, असा दावा आकर्षक जाहिरातींच्या भडिमारातून आपल्यासमोर पेश केला जातो. परंतु त्यात कितपत तथ्य आहे, हे आपण तपासून पाहत नाही. ऑलिव्ह तेल, ओट्स, ब्रोकोली, किवी, परदेशी सफरचंदे इत्यादी गोष्टी आक्रमक व भुरळ घालणाऱ्या जाहिरातींद्वारे आपल्या माथी मारल्या जात आहेत. आणि आपणही त्याला भुलत आहोत. परंतु प्रत्यक्षात हे खाद्यपदार्थ दावा केला जातो तेवढे आरोग्यदायी आहेत का? खरं तर त्यांच्या तुलनेत अनेक भारतीय धान्ये, भाज्या, फळे सकस आणि आरोग्यदायी आहेत.. भारतीयांच्या आहारसवयींसाठी अनुकूल आहेत. पण लक्षात कोण घेतोजगभरातील सर्व मानवांच्या आरोग्याचा मक्ता आपल्या शिरावर असल्यासारखे भासवून त्याच्या आडून आपली खाद्यउत्पादने जगभरातील देशांना विकण्याचा धंदा अमेरिका राजरोस करत असते. त्याचाच भाग म्हणून भारतीयांना अमेरिकी खाद्यपदार्थाची मोहिनी घालण्याचा कार्यक्रम गेल्या दोन दशकांत योजनाबद्धरीत्या राबविला जात आहे. याचे कारण- जागतिकीकरण व आर्थिक उदारीकरणामुळे खिशात अधिक पसा खेळू लागल्याने क्रयशक्ती वाढलेला, आर्थिक स्थर्य आल्यामुळे आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झालेला आणि महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिकतेचा आभास निर्माण करून आकर्षक व आक्रमक जाहिरातबाजीला सहज भुलणारा ४० कोटीहून अधिक संख्येतील मध्यमवर्गीय भारतीय ग्राहक!  ही प्रचंड मोठी बाजारपेठ अमेरिका, इंग्लंड आणि युरोपातील देशांना आपल्याकडे आकर्षित करते आहे.. त्यांच्याकडे पिकणाऱ्या आणि तयार होणाऱ्या  भाज्या, फळे तसेच अन्य खाद्यपदार्थ भारतीयांना विकण्यासाठी! या खाद्यपदार्थात ऑलिव्ह तेल, ओट्स, ब्रेकफास्ट सीरियल्स, ब्रोकोली, किवी, सफरचंदे, बदाम वगरेंचा अंतर्भाव होतो. त्यांच्या मार्केटिंगसाठी विविध माध्यमांचा हुशारीने वापर करून प्रचाराची अशी काही राळ उडविण्यात आली, की समस्त भारतीय, विशेषत:तरुण पिढी त्याने जणू खुळावलीच