Get it on Google Play
Download on the App Store

परिचय

http://veda.wdfiles.com/local--files/hinduism/vedas.gif

वेद हे जगातील बहुतेक सर्वांत पुरातन लिखित दस्तैवज आहेत. वेद हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आणि सर्वोपरी धर्मग्रंथ आहेत. सामान्य भाषेत वेद या शब्दचा अर्थ आहे 'ज्ञान'. वस्तुतः ज्ञान म्हणजे असा प्रकाश आहे जो मनुष्याच्या मनातील अज्ञान रुपी अंधःकारला नष्ट करतो. वेदांना इतिहासाचा असा स्त्रोत म्हटले गेले आहे जो पौराणिक ज्ञान आणि विज्ञानाचे अथांग भांडार आहे. वेद हा शब्द संस्कृत च्या विद या शब्दापासून निर्माण झाला. अर्थात या एका शब्दातच सर्व प्रकारचे ज्ञान सामावलेले आहे. प्राचीन भारतीय ऋषी ज्यांना मंत्रद्रिष्ट म्हटले गेले आहे, त्यांनी मंत्रांच्या गूढ रहस्यांचा अभ्यास करून, त्यांना समजून घेऊन, त्यांचे मनन करून, अनुभूती करून त्या ज्ञानाला ज्या ग्रंथांमध्ये संकलित करून विश्वाच्या समोर प्रस्तुत केले ते प्राचीन ग्रंथ म्हणजेच "वेद" होत. एक अशी देखील मान्यता आहे की हे मंत्र परमेश्वराने अप्रत्यक्ष स्वरूपात प्राचीन ऋषींना ऐकवले होते. म्हणूनच वेदांना श्रुती असे देखील म्हटले जाते.