Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

पेट्रोल भरताना रहा सतर्क ...

जनता सततच्या पेट्रोल / डीझेल भाववाढी मुळे आधीच त्रस्त असताना त्यांना आणखी पिळून घेण्याचे काम पेट्रोल पंपांवर केले जाते.

पेट्रोल पंपांवरील कामगारांवर विश्वास टाकून कीत्येकदा वाहन चालक मीटर कडे पाहत नाहीत आणि पेट्रोल भरून घेतात . अशा वेळेस पंपांवर हातचलाखी किंवा मीटर मधील सेटिंग मुळे एकूण खरेदी पेक्षा कमी पेट्रोल भरले जाते आणि ते चालकाच्या लक्षात सुद्धा येत नाही. अगोदरच ५० रुपयांवर मीटर सेट केले जाते आणि त्यामुळे एकूण खरेदी केलेल्या पेट्रोल मध्ये ५० रुपयांचे म्हणजे सुमारे अर्धा लिटर पेट्रोल कमी दिले जाते जे अनुभवी चालकाला वाहनातील इंधन काट्याच्या निर्देशांकावरून समजू शकते परंतु तो पर्यंत उशीर झालेला असतो.

काही पेट्रोलपंपांवर कमी जागेअभावी वाहन मीटरच्या पुढे घ्यावे लागते त्यामुळे मीटर चा डिस्प्ले दिसत नाही.अशा वेळी तर उघड उघड चोरी केली जाते. १०० रुपयाचे पेट्रोल भरताना ते ८० रुपयाचे भरतात आणि मीटर जवळ उभा असलेला त्यांचा कामगार लगेच काळ दाबून मीटर ० वर आणतो. ( हे मी प्रत्यक्ष पहिले आणि चांगलेच फैलावर घेतले आहे ) अशा पद्धतीने कित्येक लिटर पेट्रोलची चोरी पेट्रोलपंपधारक करतात आणि ग्राहकाची फसवणूक केली जाते.

वाहनामध्ये नक्की किती इंधन टाकले गेले आहे हे निश्चितपणे सांगणे तसे कठीण आहे. ते सर्वस्वी पेट्रोलपंपावरील मीटर काटा आणि वाहनातील इंधन मीटर काटा यावर विश्वास ठेऊन प्रवास सुरु राहतो.

दुचाकी वाहनात पेट्रोल भरताना वाहना वरून उतरणे गरजेचे आहे, कारण इंजिन आणि त्याचा exhaust पाईप अतिशय गरम झालेला असतो पेट्रोल भरताना एक थेंब सुद्धा आग लाउ शकतो आणि जीवघेणा अपघात होऊ शकतो परंतु धावपळीच्या आयुष्यात सर्वच घाईत असतात तेव्हा निदान सतर्कता बाळगू शकतो. शेवटचा थेंब सुद्धा टाकीतच पडेल याची काळजी घेण्यास पंपावरील कामगारास सांगावे. तसेच वायू (gas) वर चालणाऱ्या वाहनात इंधन भरताना सुद्धा वाहनातून उतरून काही अंतरावर उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अपघाताला निमंत्रण दिले जाते

हाच निष्काळजी पण मोबाईल फोन च्या बाबतीत सुद्धा दिसून येतो, पेट्रोल पंपावर मोबाइल फोन वर बोलणे हानिकारक आहे हे माहिती असून सुद्धा सर्रास पणे लोक याकडे कानाडोळा करतात तेव्हा सतर्कता, सावधानी मुळे आपले पैसे आणि जीव दोन्ही वाचवता येतील !!

१) पेट्रोल / डीझेल / वायू वाहनात भरताना मीटर काटा '०' वर आहे याची खात्री करा
२) सांगितलेल्या किमतीचे इंधन दिले आहे का याची खात्री करा आणि तशी पावती घ्या
३) वायू इंधन भरताना वाहनातून उतरून दूर उभे रहा
४) पेट्रोल पंपावर मोबाइल चा वापर किंवा धुम्रपान करू नका
५) इंधन भरून झाल्यावर वाहनाचा इंधन निर्देशांक तपासून पहा

लेखं  - अमोल गायकवाड (मुंबई)