Get it on Google Play
Download on the App Store

विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18

लिंगपूजा

८५. आतां महेश्वराच्या पूजेमधून लिंगपूजा कशी उद्‍भवली या प्रश्नाकडे वळूं. येथेंहि आम्हाला बहुतांशीं अनुमानावर अवलंबून रहावें लागेल. बुद्धाच्या किंवा महावीरस्वामीच्या वेळीं श्रमण लोक चातुर्मास्याखेरीज एका जागीं रहात नसत. ते सतत चोहोंकडे फिरून धर्मोपदेश करीत. दुसरें असें कीं, ते गृहस्थाश्रमाचा उपभोग घेऊन व संसारदु:खाला कंटाळून श्रमण होत असत. ह्या दोन कारणांस्तव त्यांच्या कामवासनेला मुळींच वाव मिळत नसे. पण दुसर्‍या किवा तिसर्‍या शतकांत ही स्थिति पार बदलून गेली होती. लहान मुलांना दीक्षा देऊन संन्यासी करण्याची प्रथा ह्या दोन्ही पंथांत सुरू झाली, व मोठ-मोठाले विहार व उपाश्रय यांचा आश्रय करून हे लोक सुखानें राहूं लागले. त्यामुळें कामवासनेवर विजय मिळवणें या लोकांना जड झालें. स्त्रीसंग तर राहूंच द्या, पण स्त्रीस्पर्शाला देखील ह्या श्रमणपंथांत सक्त मनाई आहे. आजलाहि गाडींतून किंवा होडींतून उतरतांना एखाद्या भिक्षूनें एखाद्या स्त्रीला हात दिला, तर त्याबद्दल त्याला मोठें प्रायश्चित्त घ्यावें लागेल. ह्या कडक नियमामुळें त्या काळच्या तरुण सन्याशांची वृत्ति वाममार्गाकडे वळली असल्यास नवल नाहीं. हस्तस्पर्शादिक न करतां केवळ नग्न स्त्रीच्या दर्शनानें कोणत्याहि नियमाचा भंग होत नसे; व कामवासना तर अंशत: तरी तृप्त होत असे. अशा ह्या प्रकारांतून लिंगपूजा निघाली असावी.

८६. जटिल तापसांचा पंथ बुद्धाच्या काळीं अस्तित्वांत होता. उरुवेलकश्यप, नदीकश्यप आणि गयाकश्यप या तीन जटिलांना त्यांच्या एक हजार जटिल शिष्यांसह बुद्धानें भिक्षु केलें, ही दंतकथा महावग्गांत आली आहे. तिचा अर्थ एवढाच असावा कीं, बुद्धाच्या भिक्षुसंघांत जटिलांचा भरणा जास्त होता. ह्या तापसांना तत्त्वज्ञान असें कांहींच नव्हतें. ते अग्नीची पूजा करून अरण्यवासांत रहात असत.

८७. बुद्धाच्या वेळीं जे दुसरे मोठे संघ होते त्यांतून एकादा श्रमण बौद्ध पंथांत आला, तर त्याला चार महिनेपर्यंत परिवास देत असत. परिवास म्हणजे श्रामणेर होऊन भिक्षूंची सेवा करून रहाणें. चार महिन्यांनंतर त्याचें वर्तन योग्य आहे असें वाटलें तर त्याला भिक्षुसंघांत दाखल करून घेत. हा परिवास देण्याचें कारण असें सांगितलें आहे कीं, एक दुसर्‍या पंथांतील श्रमण भिक्षुसंघांत शिरला, व आपल्याच उपाध्यायाला वादांत जिंकून पुन्हा आपल्या मूळच्या श्रमणसंघांत गेला. असे प्रकार होऊं नयेत म्हणून इतर पंथांतील श्रमणांना चार महिने परिवास देऊन मग संघांत घेत असत.

८८. पण असा परिवास जटिलांना व शाक्यांना देण्यांत येत नसे. शाक्य बुद्धाचे नातलगच. तेव्हां त्यांना परिवास देण्यांत येत नसे हें योग्य आहे. पण तो जटिलांना कां देण्यांत येत नसावा ? याचें कारण असें दिसतें कीं, जटिलांचे सांप्रदायिक असें कोणतेंहि दर्शन नव्हतें. तेव्हां ते वादविवादांत पडणार नाहींत, अशी बौद्ध श्रमणांची खात्री होती.

८९. आजकालहि जटाधारी बुवांची हीच स्थिति आहे. त्यांचें स्वतंत्र असें दर्शन किंवा तत्त्वज्ञान नाहीं. धुमी लावावी, अंगाला राख फांसावी व बदरीनारायणापासून रामेश्वरापर्यंत हिंडत फिरावें, हा त्यांचा धंदा. अलीकडे त्यांतहि कांहीं सम्प्रदाय दिसून येतात. पण त्या सम्प्रदायांचें कांहीं विशेष दर्शन असेल असें वाटत नाहीं. जीं चालू दर्शनें आहेत त्यांजवरचा ते भागवून घेतात. तात्पर्य काय कीं, बुद्धाच्या काळापासून तहत आजपर्यंत या जटिल सम्प्रदायाचा कोणताहि विशेष असेल, तर तो धुमी पेटवणें हा होय.

९०. एकीकडे वाममार्गांत शिरलेले तरुण भिक्षु, व दुसरीकडे हे जटिल तापसी, ह्या दोहोंच्या मधून पाशुपतांचा पंथ निघाला; व शकांच्या कारकीर्दीत तो एकसारखा फैलावत गेला. या पंथानें एक आपलें निराळें पाशुपत दर्शन बनविलें. त्याची चर्चा येथें करण्याची आवश्यकता वाटत नाहीं. जटाधारण करणें, अंगाला तीनदां भस्म लावणें, नग्न रहाणें किंवा चर्मखंड परिधान करणें, व लिंगाची पूजा करणें, हे त्यांच्या आचारांपैकीं कांहीं प्रकार होत. ह्याच पंथामुळें लिंगपूजेला महत्त्व आलें, यांत शंका नाहीं.

हिन्दी संस्कृति आणि अहिंसा

धर्मानंद कोसंबी
Chapters
विभाग पहिला - वैदिक संस्कृति 1 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 2 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 3 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 4 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 5 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 6 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 7 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 8 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 9 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 10 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 11 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 12 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 13 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 14 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 15 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 16 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 17 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 18 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 19 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 20 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 21 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 22 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 23 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 24 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 25 विभाग पहिला - वैदिक संस्कृति 26 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 1 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 2 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 3 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 4 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 5 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 6 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 7 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 8 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 9 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 10 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 11 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 12 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 13 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 14 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 15 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 16 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 17 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 18 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 19 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 20 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 21 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 22 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 23 विभाग दुसरा - श्रमणसंस्कृति 24 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 1 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 2 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 3 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 4 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 5 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 6 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 7 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 8 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 9 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 10 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 11 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 12 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 13 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 14 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 15 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 16 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 17 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 18 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 19 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 20 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 21 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 22 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 23 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 24 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 25 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 26 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 27 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 28 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 29 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 30 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 31 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 32 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 33 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 34 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 35 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 36 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 37 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 39 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 40 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 41 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 42 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 43 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 44 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 45 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 46 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 47 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 48 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 49 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 50 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 51 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 52 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 53 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 54 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 55 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 56 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 57 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 58 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 59 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 60 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 61 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 62 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 63 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 64 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 65 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 66 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 67 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 68 विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 69 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 1 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 2 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 3 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 4 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 5 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 6 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 7 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 8 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 9 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 10 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 11 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 12 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 13 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 14 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15 विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 16 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 1 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 2 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 3 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 4 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 5 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 6 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 7 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 8 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 10 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 11 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 12 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 13 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 14 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 15 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 16 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 17 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 18 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 19 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 20 विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 21