Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

सवत

हि घटना मला माझ्या आईकडून ऐकायला मिळाली .
माझ्या आईची एक मैत्रीण आहे कल्पना . तिच्या लग्नाला एक वर्ष पण झाल नसेल आणि तिचा घटस्पोट झाला .
त्यामुळे तिने दुसर लग्न केल .
तिच्या या नवर्याची बायकोही काही कारणामुळे दगावली होती . त्याला ४-५ वर्षाची २ मुले होती. त्या मुलाचं संगोपन पण होईल आणि तिचा वेळ पण निघेल म्हणुन या दोघांनी लग्न केल.
तिचा नवरा नोकरी करत होता आणि मुल लहान होती त्यामुळे हिने नोकरी न करता मुलांना वेळ द्यायचं ठरवलं .

लग्नाला २-३ दिवसच झाले होते. रात्री ती थकुन झोपली होती . तिच्या स्वप्नात एक बाई आली . आणि म्हणाली "मी माझ्या नवर्याचे आणि मुलांचे साम्भाळ करायला समर्थ आहे . तु इथे धावाळाधवळ नको करू . तु इथुन निघुन जा . "

त्यावर कल्पना म्हणाली "अग पण तुझी मुल लहान आहे त्यांची काळजी कोण करणार ."
त्यावर ती बाई म्हणाली "मी माझ्या मुलांची काळजी घेण्यास समर्थ आहे . जा ....उठून बघ . मी यांचा आणि मुलांचा डबा तयार केला आहे , पाणी भरून ठेवलं आहे . जा...जाऊन बघ . उठ. "
एवढ ऐकून कल्पना ला जाग आली .
ती लगेच kitchen मध्ये गेली .
आणि तिथे ओट्यावर खरच डबे तयार होते , पाणी पण भरून ठेवले होते .
हे बघू ती खुप घाबरली . आणि लगेच त्याच दिवशी सकाळी माहेरी निघून आली .
दुपारी तिच्या नवर्याने तिला फोन करून विचारल कि तू अशी डबे तयार करून एवढ्या सकाळी घाई घाईने कुठे निघून गेली. त्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला . आणि तिने त्याच्याकडे त्याच्या पहिल्या पत्नी चा फोटो मागितला . तर ते पाहून तिला धक्काच बसला .
रात्री तिच्या स्वप्नात जी बाई आली होती तिच या नवर्याची पहिली बायको होती.
या घटने नंतर तिने ते घर सोडले आणि ती माहेरी राहू लागली .