Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

तू भ्रमत आहासी वाया

;रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे.मोकळेपणी रडायला धैर्य लागतं.ये,पण नुसती पडून रहा.माझ्याजवळ येऊन रडायला लागलीस की मी सांत्वनासाठी शब्द शोधणार.सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडले नसतील.सांत्वन म्हणजे दुःखाच मूल.मूल आईपेक्षा मोठं कसं होईल?मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते.म्हणून,समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो.दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही.तेव्हा तू जा.बाहेर पड.एकांत शोध.तिथं तू तुझी डिग्री विसरशील.समजुतीला कुणी येणार नाही.शांत होण्याचे इशारे आतूनच उमटतील,मग आपोआप शांत होशील. तू हे बोलतेस? नवल आहे.एकाकीपण वेगळं,एकांत वेगळा,एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे.परिसराचं मौन म्हणजे एकांत.आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण.तेव्हा तू एकांतात जा,मनसोक्त रड.जमिनीला अश्रू हवे असतात.मातीचं देणं चुकवलं की हलकी होशील.वर चढशील,आकाशाजवळ पोहोचशील.असचं कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम तुका आकशाएवढा असं लिहून गेला असेल. ह्या बाबतीत नाही.तू ह्याक्षणी गुरू शोधूही नकोस.गुरूचा आधार शोधणं म्हणजे एक सुसंधी हातची गमावणं. प्रियकर परिपूर्ण असतो.नवर्याला मर्यादा असतात कारण ’संसार हा व्यवहार आहे.प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं.’मी’ उरत नाही.म्हणून संघर्ष नसतो.संसारात तसं होत नाही.’

’प्रेम म्हणजे मरण असतं.’मी’ हा शब्द प्रेमात आणि भकतीत उरत नाही.मरणात तेच होतं.ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे,तोच खरं प्रेम करु शकतो.’

’सुर्यप्रकाश वाढू लागला की दंवबिंदू आपोआप नाहीसे होतात.’

’अंधार्या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो.वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो.मग काही काळ चालणं अवघड जातं.म्हणून सांगतो.गुरू शोधू नकोस.चालणं,ठेचकाळणं,रक्तबंबाळ होणं,एकाकी पडणं,दरीत कोसळणं,हे सगळ घडू दे.नियती,प्रारब्ध हे अड्थळे मानू नकोस.ते सौभाग्य आहे.आगीतून जा.कचरा जळून जाईल.सोनं उरेल.प्रेमपुर्तीत साफ़ल्याची शंका असते,प्रेमभंगातलं वैफ़ल्य नवी पायवाट शोधायला लावते,स्वतःच्या मालकीच अनुभव घेणारा प्रत्येकजण वेगळा असतो आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्वं दुसर्याला थेअरी वाटते. कबुतराला गरूडाचे पंख लावता येत नाहीत.कदाचित लावता येतीलही,पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही डणं भोगायचं असतं.हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा,सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी,दुःखाला घर हवं.कारणही हवं. व्यवहाराला गंध नसतो.स्पर्श नसतो.सूर नसतो.गोंगाट असतो.रूचीच नसते मग अभिरूचीची बातच दूर. प्लास्टीक़च्या फ़ुलांना फक्त धुळीचा शाप.सर्फनं धुतली की झालं.पण नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाहीत.जन्म-मरणाचाच फ़ेरा नसेल,तर शहारे-रोमांच,आसक्ती,विरह मिलन,भय,सगळ्यातूनच मुक्ती.जिवंत फ़ुलं स्वाभिमानी असतात.धुळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करतात. निर्माल्य म्हणजे हौतात्म्य. धुळिचा पेहराव म्हणजे अमरता.

व.पु.काळे संकलन

व.पु.काळे
Chapters
तप्तपदी
प्लेझर बाँक्स १
तू भ्रमत आहासी वाया
गुलमोहर