All Marathi Stories

अभिराम मत्स्यकन्या

विक्रमाने हट्ट सोडला नाही. तो झाडाजवळ गेला. प्रेत खांद्याने टाकले व नेहमीप्रमाणे मौनपणे स्मशानाकडे निघाला. तेव्हा प्रेतात बसलेला वेताळ बोलू लागला— "राजा! तुला इतके कष्ट सहन करीत असलेला पाहून वाटते की कोणीतरी तुला शापच दिला असावा. परंतु तू सामान्य अभिषप्त माणसासारखा दिसत नाहीस. मत्स्यराजाची कन्या मुक्तामयीप्रमाणे तू स्वतः होऊन अभिषप्त झालेला दिसत आहेस. तुला कंटाळा येऊ नये म्हणून मी तुला मत्स्यराजाच्या कन्येची गोष्ट सांगणार आहे. ऐक." असे सांगून वेताळाने गोष्ट सांगायला सुरुवात केली. मत्स्यलोकाच्या राजकन्येचे नाव मुक्तामयी होते. ती अप्रतिम रूपवती होती. तिच्या रूपावर भाळून जाऊन फणीमुख नामक एका नागजातीच्या तरुणाने तिच्याशी लग्न करण्याचे ठरविले. परंतु तो स्वतः मात्र कुरूप होता. म्हणून मुक्तामयी त्याला भेटायला देखील तयार नाही. "अशी मुलगी तुझ्याशी लग्नास तयार नाही. म्हणून तू तिची आशा सोडून दे." मुक्तामयीच्या आईवडिलांनी फणीमुखाला कळविले. परंतु फणीमुखाच्या मनाचे समाधान त्या उत्तराने कसे होणार? त्याने मुक्तामयीचा विचार मनातून काढून टाकण्याऐवजी तिच्याशीच लग्न करण्याचा हट्ट मनात धरला. त्याने मुक्तामयीचे अपहरण करण्याचे आपल्या मनात ठरविले. परंतु त्या प्रयत्नात त्याला यश मिळाले नाही. याशिवाय सर्व जलचर सृष्टीतील रहिवाश्यांना त्याचा दुष्ट हेतू कळला. त्या दिवसापासून फणीमुखाला मत्स्यलोकात निश्चितपणे राहणे दुरापास्त झाले. तो चंपा सरोवरातून भूमीवर आला व सरोवराजवळ एक बिवर खणून बिळात राहू लागला. फणीमुख मत्स्यलोक सोडून निघून गेल्यावर मुक्तामयी निर्भयपणे हिंडू लागली. कारण तिला धास्ती वाटे की केव्हा व कोठून फणीमुख येतो, कोण जाणे! परंतु तेव्हापासून ती मोकळेपणाने हिंडू लागली. एकादा ती चंपा सरोवराच्या मार्गाने भूलोकात आली व चंपा वनात निघून गेली. त्यापूर्वी तिने कधी भूलोक पाहिला नव्हता. म्हणून चंपा वनातील दृश्य तिला फार मनोरम वाटले. मुक्तामयी ही दृश्ये पाहत निर्भयपणे हिंडत असता फणीमुख अचानक विळातून बाहेर आला व तिच्यासमोर येऊन उभा राहून तिला म्हणाला— "माझ्या शोभार्थ आली आहेस वाटते? ये, माझ्याशी लग्न कर आणि सुखाने येथेच राहा." फणीमुखाला पाहताच मुक्तामयी मोठ्याने किंचाळली व ती चंपा सरोवरात उडी मारणार, पण इतक्यात फणीमुखाने तिला सरोवकडे जाऊ दिले नाही. मुक्तामयी घाबरून गेली होती. तिचे सर्व अंग थरथर कापत होते व ती सारखी पळत होती. तिची ती किंकाळी ऐकून त्या देशाचा युवराज जंगधर तिकडे धावत आला. त्याने धावत असलेल्या रूपवती मुक्तामयीला व तिचा पाठलाग करीत असलेल्या फणीमुखाला पाहिले. तो आला होता शिकारीसाठी. परंतु जनावरांच्या शिकारी ऐवजी त्याला हे दृश्य पाहावयास मिळाले. मुक्तामयी धांबत धांबत तो उभा होता तिथे आली व म्हणाली— "हा दुष्ट नागा पाठलाग करीत आला आहे. याला ठार करून माझे रक्षण कर." जंगधर शूर व साहसी होता. त्याने फणीमुखाच्या डोक्यावर वार केला. दोघांचे द्वंद्व चालू असताना इकडे मुक्तामयीने सरोवरात उडी मारली व पाण्यावर डोके काढून द्वंद्व पाहू लागली. जंगधरचा वार मर्मावर बसला होता. प्राणत्याग करण्यापूर्वी फणीमुख म्हणाला— "मी इतक्या विनवण्या केल्या तरी तू माझ्याशी लग्न करण्यास तयार झाली नाहीस. उलट माझ्या आत्मभिमानास डिबचण्यासाठी स्वतः होऊन मी तोंड लपवून बसलो होतो तेथेवर आलीस. याहि पुढें तू या युवराजकरवीं मला ठार करविलेस. या युवराजासाठी म्हणून जर यदाकदाचित तू या भूमीवर पाऊल टाकलेंस तर तू एक दगड होऊन जाशील." असा शाप देऊन फणीमुखाने प्राण सोडला. तें ऐकून मुक्तामयीने सरोवरात बुडी मारली व सरळ मत्स्यदेशात निघून गेली. जंगधरला हे सर्व कळले नाही. कारण फणीमुखाला ठार केले त्यावेळी त्याचे अनुयायी त्याचा शोध काढीत आले. त्याची तलवार रक्ताने माखलेली पाहून त्यांना वाटले की युवराजाला लागले असावे. "मला नाही लागले कोठे. पण तो नागदेव कोठे निसटून गेला हे जाऊन पाहिले पाहिजे. तो जिवंत असेल असे नाही वाटत मला." तो म्हणाला. तोपर्यंत फणीमुख मेला होता. नंतर जंगधर ज्या तरुणीचे त्याने रक्षण केले होते ती कोठे आहे हे पाहू लागला. परंतु ती त्याला कोठे दिसली नाही. त्याने सरोवराजवळ जाऊन पाहिले तेव्हा त्याला मुक्तामयी फक्त एकदाच चवी चमकली व नंतर अदृश्य झाली. युवराजाच्या अनुयायांना तो कोणाच्या शोधाथ फिरत आहे हे कळले नाही. त्यांपैकी एकाने देखील मुक्तामयीला पाहिले नव्हते. जंगधरला तिच्याविषयी कोणाजवळ काही बोलावेसे पण वाटले नाही. हताश होऊन तो त्यांच्याबरोबर घरी परतला. जंगधर घरी आला खरा, परंतु त्याचे चित्त चंपा सरोवराच्या काठी होते. मुक्तामयीचे रूप सतत त्याच्या हृदयात वसत होते. ते दोन तीन दिवस तीन युगासारखे वाटले त्याला. तिच्या विरह दुःखाने त्याला आपल्या जीविताचा वीट आला. एकादा तो कोणालाही काही कळविल्याशिवाय चंपावनात गेला आणि चंपा सरोवराच्या काठीच या आशेने हिंडत राहिला की कदाचित मुक्तामयीशी भेट होईल. तेव्हा त्याला सरोवराच्या काठी एक मणी दिसला. तो मणी फणीमुखाच्या डोक्यातला होता. तो उचलल्याबरोबर त्याच्या मनातून पाण्याचे भय नाहीसे झाले. त्याने चंपा सरोवरात उडी टाकली. जणू काही पाणी स्वतःच त्याला वाट दाखवीत होते. तो निर्विघ्नपणे मत्स्यलोकात जाऊन पोहोचला. तिकडे जंगधरच्या मनासारखीच मुक्तामयीच्या मनाची स्थिती झाली होती. जंगधरने तिचे रक्षण केले त्या वेळेपासून तिचे मन त्याच्यावर बसले होते. फणीमुखाने शाप दिला नसता तर कदाचित ती पाण्याबाहेर येऊन जंगधरला भेटली देखील असती व त्याच्याशी लग्न करून त्याच्याबरोबर राहू लागली असती. परंतु ते शक्य नव्हते व जंगधरला मत्स्यलोकात प्रवेश मिळणे अशक्य होते. म्हणून मनातल्या मनात ती झुरत राहिली. कोणी मानवजातीचा तरुण मत्स्यलोकात आला असल्याचे वर्तमान कळताच ती धावत धावत त्याला भेटण्यासाठी आली. जंगधरला पाहून तिचे देवानंद तिचे गांधणे ऐकून तिचे जंगधरशी मीलन घडवून आणले. ती आपल्या महालात त्याला बोलावून घेऊन गेली. नंतर मुक्तामयीने आपल्या आईवडिलांना आपल्या मनांतली इच्छा कळविली. त्यांनी मुक्तामयीच्या इच्छेप्रमाणे जंगधरशी तिचे लग्न करून दिले व मलोकांत आपल्या मुलीला पाठवण्याची तयारी करू लागले. परंतु आश्चर्य म्हणजे स्वतः मुक्तामयीच त्या गोष्टीस तयार झाली नाही. तें ऐकून जंगधर तिला म्हणाला— "मला भूलोकांत तुझ्याहून जास्त प्रिय असे काय आहे? मी भूलोक सोडून येथेच तुझ्या संगतीत राहावयास तयार आहे." जंगधर पाच वर्षे मत्स्यलोकात सुखाने राहिला. त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. पाच वर्षे आनंदात निघून गेली, कळले देखील नाही. एकादा स्वदेशी जाऊन आईवडिलांना भेटून यावे असे साहजिकच जंगधरला वाटले व मुक्तामयीच्या अनुमतीने तो त्या मण्याच्या सहाय्याने स्वदेशी आला. परंतु तिकडे स्वदेशी जंगधर निघून गेल्यापासून त्याचे आईवडील काळजींत पडले. तो कोठे गेला हे कोणाला काही माहित नव्हते. पुष्कळ शोध केला पण त्यांचा थांगपत्ता लागला नाही. पुत्रविरहाने बापाने अंथरूण धरले, अनेक वैद्य आले व त्यांनी नानाप्रकारचे औषध पाणी करून पाहिले. पण गुण पडला नाही. म्हाताऱ्याचा अंतकाळ जवळ येऊन ठेवला. गादीला कोणी वारस नाही. सुदैवाने त्या परिस्थितीत जंगधर परत आलेला पाहून सर्वांस परमानंद झाला. मुलाला पाहून बापाला पुनर्जन्म मिळाला. मुलाकडून घडलेला सर्व वृत्तांत ऐकून म्हातारा म्हणाला— "आतां जे झाले ते झाले. सर्व विसरून जा. तू भूलोकांत राहून राज्य करणार तेव्हा मानवजातीच लग्न करून घेऊन जाईज करावे. पुढे प्रजेचा भार तुझ्या शिरावर येऊन पडणार. माझ्या मन:शांती करिता तरी तू हे करावे." परंतु जंगधर बापाला म्हणाला— "या आयुष्यात मी एक पत्नी घेऊनच राहणार. मुक्तामयी माझी पत्नी! मी इतर कोणालाही स्त्रीशी विवाहा तयार नाही." "तर मग तिलाच घेऊन ये आणि राज्यभार सांभाळ." वृद्ध राजा म्हणाला. जंगधरने विचार केला की मुक्तामयी त्याची मन:स्थिती ओळखून भूलोकांत येऊन राहायला तयार होईल. तो मत्स्यलोकात गेला व सर्व वृत्त सांगून भूलोकांत चलायला त्याने मुक्तामयीजवळ विनंती केली. मुक्तामयी सर्व ऐकून म्हणाली— "तर मग वडिलांच्या इच्छेप्रमाणे एका मानव स्त्रीशी विवाह करून राज्य करण्यास काय हरकत आहे?" "ती गोष्ट शक्य! तुझ्याशिवाय आता माझे प्रेम कोणावर बसणार? दुसरे लग्न करण्याचा विचार माझ्या मनात येत नाही. पण भूलोकांत यायला तुला काय हरकत आहे?" जंगधरने तिला विचारले. मुक्तामयीच्या आईवडिलांनी देखील जंगधरचे अनुमोदन केले. "बरं तर चला!" असे म्हणत मुक्तामयी आपल्या प्रियकराबरोबर भूलोका निघाली. चंपा सरोवराच्या काठावर पाय ठेवताच फणीमुखाने दिलेल्या शापामुळे ती प्रस्तर-मूर्ती होऊन गेली. येतवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला— "राजा! मला हे कळत नाही की माहित असून मुक्तामयी शापाला का बळी पडली? शापाची गोष्ट तिने जंगधरला सांगितली असती तर त्याने ती स्थिती आणून दिली नसती? नंतर हजार वर्षे जरी ती पतीबरोबर राहिली असती तरी तिला ते निराळे सुख काय लाभले असते? तुझे डोकयांची शंभर छकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील." "दोन कारणे आहेत याला. जंगधरचे प्रेम तिला सर्वोपरी वाटत होते. कारण तो दुसऱ्या लग्नास तयार झाला नाही. तिने आपल्या शापाची गोष्ट सांगितली असती तर जंगधर आपले राज्य सोडून मत्स्यलोकांतच कायमचा राहू लागला असता. बायकोच्या प्रेमासाठी पतीने कर्तव्यच्युत व्हावे ही गोष्ट कोणत्या पतिव्रतेला आवडेल? म्हणून या संकटांतून तोड म्हणून शापाला बळी पडणे हाच एक उपाय तिला दिसला. शापाचे दुसरे कारण असे की तिला पतिप्रेम मिळाले व दोन मुले पण झाली होती. त्याचे उत्तर माहित असून दिले नाहीस तर तुला परिणाम माहितच आहे." अशा तऱ्हेने राजाचे मौन भंग होतांच वेताळ प्रेताबरोबर अदृश्य झाला व पुन्हा झाडाच्या फांदीला जाऊन लोंबकू लागला.