Android app on Google Play

 

।।आई।।

 

तू ...,आई अशी कशी
सारं सोसूनही ऊभी कशी
मुलाचं, मुलीचं हवं नको पाहून
नात्याला जपताना
सारी दु:खं गिळतीस कशी
उसंत नाही तुझ्या कामाला
घराला उभं करताना
हसतमुख तू असतेस कशी ?
एकच ध्यास, एकच आस
चंदनासारखं झिजायचं
सगळ्यांना मायपंखाखाली घेऊन
दिवस रात्र फक्त घर सावरायचं
आई तूच तर आहेस
वैभव घराचं
पण ....
ज्यांची आई देवाघरी गेलीय
त्या बाळांनी काय करायचं ?

                        --शिवशालूसुत
                          दि-२९/०८/२०१९
                          क।।  बावडा, कोल्हापूर.