किडनॅपिंगची गाडी
लहान असताना आपल्याला
भिती घालण्यासाठी आई-वडील विविध शक्कली लढवत असत. “झोप नाहीतर बुवा येईल” (हा बुवा
म्हणजे कोण आणी तो कसा दिसतो ? या प्रश्नाचे उत्तर मला अजातागायात मिळाले नाही)
किंवा “जेवलास नाही तर भूत तुला घेवून जाईल”(भुताचेही तसेच आहे, हा भूत मी
आजतागायत पाहिले नाही) वैगरे वैगरे अशी अनेक वाक्य आपल्याला भीती जणू घालण्यासाठी
तयारच करून ठेववलेली असतात. मात्र अशाही काही गोष्टी, प्रसंग, व्यक्ती असतात
ज्यांना आपण लहानपणापासून घाबरत आलेलो असतो किंवा त्यांचा दारारा आपल्या मनात कायम
राहतो. म्हणजे अनेकवेळा आपण आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला घाबरत असतो.
मात्र अनेकदा तर काही अशां अफवा पसरतात कि आपोआपच आपल्या मानता एक प्रकारची भीती
निर्माण होते आणि आपण स्वतःहूनच सावध राहत असतो.
