एक कोल्हा , बहु भुकेला ...

एक कोल्हा, बहु भुकेला, फार होता कावला

एक तुकडा परी न त्याला, खावयासी गावला

बापड्याने जंगलाचा भाग सारा धुंडला

भर दुपारी तो बिचारा दीनवाणा हिंडला

शेवटाला थकून गेला सावलीला थांबला

उंच होते झाड त्याला उंच शेंडा कोवळा

बसून वरती खाऊ खाई एक काळा कावळा

चोचीमध्ये मास धरुन चाखीतो तो मासला

मारुनिया हाक त्यासी गोड कोल्हा बोलला,

"एक गाणे गा मजेने साज तुमचा चांगला

कोकिळेचे आप्त तुम्ही, घरीच त्यांच्या वाढला"

मूर्ख वेड्या कावळ्याने रागदारी मांडली

चोचीमधली चीज त्याच्या त्वरीत खाली सांडली

धावला कोल्हा सुखाने घास त्याने सेविला

गीत - ग. दि. माडगूळकर