सोन्याच्या धारा चंदेरी...

सोन्याच्या धारा

चंदेरी वारा

पाऊस आला

उडत भरारा

थेंबावर थेंब

डोंगर चिंब

खुलून दिसे

आभाळबिंब

ये रे पावसा

ठुमकत असा

देईन तुला

मोत्यांचा पसा

पावसाची धार

डोले शिवार

चोहिकडे दिसे

हिरवे हिरवेगार