थेंबातून आला ओला आनंद ...

थेंबातून आला

ओला आनंद

कण नि कण

झाला धुंद

थेंबातून आला

रेशीम झुला

झुळूक येता

मनात झुलला

थेंबातून आला

कोवळा श्‍वास

मोकळ्या रानाला

हिरवा ध्यास

थेंबातून आला

कोण चित्रकार

आनंद बन

झाले रंगाकार