← Back
Cover of बेपत्ता पाय

बेपत्ता पाय

by अक्षय मिलिंद दांडेकर

त्याचे दोन्ही पाय कापलेले होते, तो साधारण सात आठ वर्षांचा होता, रंग गोरा दिसत होता पण चेहरा धुळीने माखलेला होता. लाल दिवा नव्वद सेकंदात हिरवा होणार होता. टिक टिक करून आकडे खाली लोटत होते… नव्वद…एकूणनव्वद.....ऐंशी. त्या मुलाला पाणी हवे होते. त्याने हातानेच खुणा करत विचारले. रिक्षावाल्याने त्याला त्याची बाटली दिली, त्याने आ करून घटाघट पाणी प्यायले आणि बाटली परत केली.

Chapters

Related Books