चांदणे संभ्रमाचे...

शोधीले मी कैक रस्ते 
विझलेल्या त्या क्षणांचे....

का शृंगार करती काळोखात रात्र
पैंजनें बांधून मुक्या वेदनेचे...

चंद्राच्या विरहात न दिसे नभी
दुधाळ चांदणे स्पंदनाचे....

मी वेड्यागत अधीर होतो
ऐकण्यास तरंग तुज मनाचे...

तुही सुरेल गात गेली
भाव ते हृदय तोडण्याचे...

कसे गुंफत गेलो मी
फाटके आभाळ चांदण्याचे...

माझ्या शब्दात तुज गुंफतांना
ना कळले हे चांदणे संभ्रमाचे.....

संजय सावळे