आयुष्य आणि होळी

देऊ कशी मी तुज 
शपथ या देवतांची,
भाळून रंगावरती
सावळ्या विठ्ठलाची...

निद्रेत असता कधी
खुनावते वाट स्वप्नांची,
खुलवी रंग निराळे
ती पहाट सोनपावलांची...

शापित करून होळी 
झाली धूळवड आयुष्याची
हळूच  सोडली अश्रूंने
साथ मुक्या पापण्यांची...

संजय सावळे