युवतिमना दारुण रण रुचिर प...

ताल दादरा.

युवतिमना दारुण रण रुचिर प्रेमसें झालें ।

रणभजना संसारीं असें अमर मीं केलें ॥ध्रु०॥

रमणीमनहंसा नर साहससरसीं रमवी;

शूर तोचि, विजय तोचि; हें शुभ यश मज आलें ॥१॥