अनार्या खास ती समजा ॥ न...

राग काफी, ताल त्रिवट.

अनार्या खास ती समजा ॥

न गणित जी स्वपतिमनपूजित नरवरवरित देवकार्या ॥ध्रु०॥

पुरुष धनुर्धर संसाररथा, सारथिसम भार्या ।

उलट जरी रथ चाले, येत मरण शौर्या ॥१॥