पंचशरें गद्यवरें वश जी झा...

राग काफी, ताल दादरा.

पंचशरें गद्यवरें वश जी झाली ।

नाटयकला कविकृष्णा माला घाली ॥ध्रु०॥

ऐशा या समयाला । प्रेमरसें कवि नटला ।

गात असे कवनाला । संगीतीं नवलीला ।

ऐकाया लोलुप अति सभा बैसली ॥१॥