तुज दिधले दुःख मी म्हणूनी...

राग जोगी - ताल धुमाळी


तुज दिधले दुःख मी म्हणूनी । का मजवरि बसलिस रुसुनी ॥धृ०॥
बघ सखे नेत्र उघडोनी । मी दीन तुजवांचोनी । (चाल)
हो प्रसन्न मज वरदानी । हा तव भजनी ।
राग सोडोनी करि भाषण या स्मित वदनी ॥तुज०॥