आतां राग देई मना शांततेला...

अंक तिसरा - प्रवेश चवथा - पद ५२

आतां राग देई मना शांततेला;

वीर हा; असुर-संहार झाला ॥धृ०॥

कोप दुर्गचि खरा दुर्बला जाहला,

विजयदायक मला, वंदी याला ॥१॥


राग बागेश्री; ताल झपताल.

("आतां राम पाहे मना" या चालीवर.)