सूर्याची उत्पत्ती कशी झाली? त्याचे आयुष्य किती वर्षांचे आहे?

पृथ्वीवर आपण ऊर्जेसाठी जो सर्वात मोठा प्रकल्प बांधलाय त्यातून आपण 22,500 मेगावॉट इतक्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती करू शकतो. आणि सूर्याची उर्जा निर्मिती क्षमता 38,000 कोटी मेगावॉट एवढी आहे. जी दर सेकंदाला नव्याने निर्माण होते. एवढा मोठा उर्जेचा स्त्रोत संपायला अजून बराच अवकाश आहे. म्हणजे आपण दिर्घायुषी (तिर्घायुशी) झालो तरी उर्जेच्या या मोठ्या स्त्रोताचे उपभोग घेऊ शकतो.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-712e7cfcd5db740beaa9f6b2a6edc5f9

शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार सूर्याचा जन्म 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाला. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम यापासून बनलेला मोठा गोळा आहे. याचे बाह्य आवरण हे हायड्रोजन, हेलियम, लोह, सिलिकॉन, सल्फर, मॅग्नेशियम, ऑक्सिजन, कॅल्शियम, क्रोमियम या तत्वांपासून बनलेलं आहे. सूर्य हा तिसऱ्या पिढीमधील तारा असून त्याचा जन्म हा जवळच्या एखादया ताऱ्याच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या प्रघाती तंरंगांमुळे झाला आहे. सोने व युरेनियम यासारख्या जड मूलद्रव्यांचा सूर्यमालेतील भरपूर आढळ हा याचा पुरावा आहे. ही मूलद्र्व्ये एक तर ताऱ्याच्या स्फोटाच्यावेळी होणाऱ्या आण्विक प्रक्रियांमुळे किंवा द्वितीय पिढीतल्या ताऱ्यामध्ये न्यूट्रॉन कण शोषले जाऊन झालेल्या अणुबदलांमुळे तयार झाली असावीत. सूर्यामध्ये स्फोट होण्याइतके वस्तुमान नाही.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-f0c505fbb88289f6a3442243c7903499

सूर्य हा G2V या वर्णपटीय विभागात (spectral class) मोडतो. G2 म्हणजे त्याच्या पृष्ठभागाचे तापमान जवळपास 5500 केल्व्हिन असून त्याचा रंग पिवळा आहे. त्याच्या वर्णपटामध्ये आयनीभूत व निष्क्रिय धातूंच्या रेषा आहेत. V म्हणजे सूर्य हा बहुतेक इतर ताऱ्यांसारखा 'मेन सिक्वेन्स' मधील तारा आहे. सूर्य त्याचे हायड्रोस्टॅटिक संतुलन सांभाळून आहे त्यामुळे तो प्रसरणही पावत नाही किंवा आकुंचनही पावत नाही. आपल्या आकाशगंगेत 100 दशलक्षापेक्षाही अधिक तारे G2 वर्गात मोडतात. लोगॅरिथमिक आकारमान वर्गीकरणावरुन सूर्य आकाशगंगेतील ताऱ्यापेक्षा 85% जास्त तेजस्वी आहे. बाकीचे बरेच तारे हे लाल बटू (Red Dwarf) आहेत. सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्रापासून 25,000 ते 28,000 प्रकाशवर्षे दूर असून आकाशगंगेच्या केंद्राला प्रदक्षिणा घालत असतो. एक प्रदक्षिणा सुमारे 22.5 ते 25 कोटी वर्षांनी पूर्ण होते. त्याचा प्रदक्षिणेतील वेग सेकंदाला 220 किलोमीटर इतका आहे, म्हणजेच 1400 वर्षांमध्ये तो एक प्रकाशवर्ष अंतर पार करतो. तर एक खगोलशास्त्रीय एकक (Astronomical Unit) अंतर 8 दिवसांमध्ये पार करतो.

त्याचे हायड्रोजन इंधन संपल्याने बाह्यावरण प्रसरण पावेल तर केंद्र आकुंचन पावेल व गाभ्याचे तापमान खूपच वाढेल. गाभ्याचे तापमान ३०० कोटी केल्व्हिन इतके झाल्यावर हेलियममध्ये अणू-संमेलन क्रिया सुरू होईल. सूर्याचे बाह्य आवरण प्रसरण पावून त्याचा आकार पृथ्वीच्या कक्षेइतका होईल. सध्याच्या संशोधनानुसार सूर्याने (Red Giant) लाल राक्षसी ताऱ्याच्या सुरुवातीलाच वस्तुमान गमावल्यामुळे पृथ्वीची कक्षा सध्याच्या कक्षेपेक्षा दूर जाईल व सूर्याच्या पोटात जाण्यापासून वाचेल. तरी पृथ्वीवरील पाणी व वातावरण उकळून नष्ट होईल. लाल राक्षसी अवस्थेनंतर तीव्र तापमान स्पंदनांमुळे सूर्याचे बाह्य आवरण फेकले जाईल व प्लॅनेटरी नेब्युला तयार होईल. शेवटी सूर्य श्वेत बटूमध्ये (Wihte Dwarf) रुपांतरित होईल. हा कमी व मध्यम वस्तुमानाच्या ताऱ्यांमधे आढळणारा जीवनक्रम आहे.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-390b6a480c4421178db71bfb94d40e90

शास्त्रज्ञ काही वर्षांपूर्वी असं मानत होते की, सूर्य सामान्य इंधना सारखं जळत राहतोय. पण मग त्यांना एक प्रश्न पडायचा की हे असं असेल तर इंधन संपत का नाही? 1920 मध्ये ह्यावर अजून अभ्यास केल्यावर त्यांना कळालं की ही एक Nuclear Fusion प्रोसेस आहे.

या Nuclear Fusion वर सध्या युद्धपातळीवर काम सुरु आहे. हे काम यशस्वी झालं की मनुष्य जातीला कधी न संपणाऱ्या इंधनाचा स्रोत मिळेल. सध्या युरोप, चीन, जपान, रशिया, अमेरिका आणि भारत हे संयुक्तिकपणे यावर काम करत आहेत.

ही तीच प्रक्रिया आहे ज्याआधारे हायड्रोजन बॉम्ब कार्यरत होतं.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-bb545060fe4d318a080540eef8d075c3

सूर्याच्या मध्यभागी हायड्रोजन कण प्रचंड दबावाखाली असतात. या कणांची एकमेकांशी टक्कर होऊन हेलियम जन्माला येते. म्हणजे प्रत्येक सेकंदाला 6570 लाख टन हायड्रोजनचं 6530 लाख टन हेलियम मध्ये रूपांतर होतं.

या प्रोसेसमध्ये जवळ पास 40 लाख टन हायड्रोजनचं रूपांतर होतच नाही. त्याचं रूपांतर ऊर्जेत होतं. हीच ऊर्जा अवकाशात सर्वत्र पसरली जाते.

संशोधक असं सांगतात की, “सूर्याची ही प्रक्रिया आणखी 4.5 कोटी वर्षे चालेल. त्यानंतर सुर्यामधील हायड्रोजन समाप्त होईल.. त्यामुळे कोअर तापमान प्रचंड वाढेल. यामुळे सूर्याचा आकार आहे या पेक्षा 100 पटीने वाढेल. याला Red Giant म्हणतात. असं झालं तर सूर्य सर्व प्रथम बुध आणि शुक्र या ग्रहांचा विनाश करेल आणि त्यानंतर आपल्या पृथ्वीचा. तिथून पुढे हजारो वर्षे सूर्यात फक्त हेलियम शिल्लक राहिलेलं असेल. मग ते हेलियम कार्बनमध्ये रूपांतरित होईल, त्यामुळे सूर्याचा आकार अजून वाढेल. त्याचे तापमान असेच वाढत राहून पुढे तो जळून जळून कोळश्यासारखा होईल. आणि अश्या प्रकारे सूर्याचा अंत होईल. हे व्हायला 4.5 कोटी वर्षे लागतील.”

आपल्या आकाशगंगेत सुर्यासारख्या कित्येक ताऱ्यांचा अंत झाला आहे आणि नव्याने जन्म ही झाला आहे. अवकाशात ही आरंभ आणि अंताची क्रिया अशीच अविरतपणे चालू राहील.