Bookstruck
Cover of माझी युरोप टूर

माझी युरोप टूर

by अनिल दातीर

यावेळी आम्ही 'पोलंड-स्लोव्हाकिया-हंगेरी' असा युरोप मधील तीन देशांचा दौरा आखला होता. मुंबईतून डायरेक्ट पोलंड फ्लाईट न मिळाल्याने अगोदर मुंबई ते दुबई आणि नंतर दुबई ते वॉर्साव (पोलंड) असा एकूण अकरा-बारा तासांचा प्रवास होता. मुंबईतून रात्रीचा प्रवास असल्याने विमानतळ सोडल्यानंतर लगेचच बाहेर जग सगळं अंधारात बुडून गेलं. दुबईत पोहोचो तर सकाळ झालेली होती. पुढची फ्लाईट लगेचच असल्याने पळत पळतच आम्ही त्या टर्मिनलला पोहोचलो. आतल्या आतच ट्रान्सफर असल्याने इमिग्रेशन प्रक्रिया तशी एकदमच सोपी झाली होती. लवकरच विमानात प्रवेश करत आम्ही आपापल्या सीट पकडल्या. मी अगोदरच विंडो सीट रिझर्व्ह करून ठेवली होती. दुबईहून निघालेलं विमान जसजसे पश्चिमेकडे जाऊ लागले तसतसे खाली दिसणाऱ्या करड्या, विराण टेकड्या मागे पडत होत्या. बराचवेळ या वैराण भागावरून प्रवास चालू होता, सौदी अरेबिया, इराक, सिरिया, टर्की, हा बराचसा भाग विमानातून करडा, रखरखीत दिसतो. विमानातील प्रत्येक सीटसमोर असलेल्या स्क्रीनवर हा प्रवास आपल्याला दिसत असतो. विमानाच्या छोट्या खिडकीतून मधेच कुठे एखादे शहर दिसत होते. आकाश निरभ्र असल्याने खालचा परिसर एवढ्या उंचीवरूनही भकास, विराण असलेला दिसत होता. पुढे पुढे हे दृश्य बदलून टेकड्यांच्या उंच भागावर साठलेले बर्फ दिसू लागले. आणि काही वेळाने सर्व काही धुक्यात हरवून गेले.

Chapters

Related Books

Cover of सोनसाखळी

सोनसाखळी

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of माझी दैवते

माझी दैवते

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of श्यामची पत्रे

श्यामची पत्रे

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of मानवजातीची कथा

मानवजातीची कथा

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of दारुवंदीच्या कथा

दारुवंदीच्या कथा

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of जीवनाचे शिल्पकार

जीवनाचे शिल्पकार

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of श्यामची आई

श्यामची आई

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of साक्षरतेच्या कथा

साक्षरतेच्या कथा

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of भारतीय नारी

भारतीय नारी

by पांडुरंग सदाशिव साने

Cover of धडपडणारी मुले

धडपडणारी मुले

by पांडुरंग सदाशिव साने