।।।गज़ल ।।।

।।।गज़ल ।।।
पावसाच्या त्या सरींनी पार दोघे चिंब झालो ।
ती तनाने चिंब झाली मी मनाने तुंब झालो ।।


स्पर्शुनी तारूण्य ओले कैफ चढला त्या सरींना
तो नशा उन्माद ओला मी अधाशी धुंद झालो ।।


काय होते ते नशीबी पावसाचे थेंब सारे
वाटले की मीच कां ना पावसाचा थेंब झालो ।।


ओघळोनी सांडले जे त्या तनूचे स्पर्श पाणी
ती नशा होती शराबी घोट घेण्या रींद झालो ।।


ज्या सरींनी देह ओला पेटवी वणवा मनी या
पेटती कैश्या "अभय"नां त्या सरी मी गुंग झालो ।।


रींद=दारु पिणारा।
अभय कारखानीस भांडूप (प)