आमची तो दशा विपरीत झाली ।...

आमची तो दशा विपरीत झाली । कोण आम्हा घाली पोटामध्यें ॥१॥

आमचें पालन करील बा कोण । तुजविण जाण दुजे आतां ॥२॥

कळेल तें करा तुमचें उचित । माझी तो नित निवेदिली ॥३॥

सोयरा म्हणे माझा जीवप्राण तुम्ही । आणिक तो आम्ही कोठें जावें ॥४॥