कोण या पांगिला होईल संसार...

कोण या पांगिला होईल संसारा । कन्या पुत्र दारा त्यजोनियां ॥१॥

कां हे गुंतले वांया मृगजळा । कां यासी कंटाळा येईच ना ॥२॥

कां ये नाठविती हरीनाम चित्तीं । येतां जांतां फजिती किती होती ॥३॥

कां हे न धरीती संतसमागम । कासयाचा भ्रम पडिला यांसी ॥४॥

स्वप्नाचीये परी गुंतले नरनारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥५॥