उपाधी भक्तांसाठी । कां जग...

उपाधी भक्तांसाठी । कां जगजेठी लाविली ॥१॥

तोडा तोडा मायाजाळें । कृपाबळें आपुलिया ॥२॥

नक पाहूं गुणदोष । पूर्वीची भाष सांभाळा ॥३॥

जगीं असुनी तूं बा हरी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥