मनाचेनि मनें केला हा निर्...

मनाचेनि मनें केला हा निर्धार । भवसिंधुपार तरावया ॥१॥

नामाची चांगले नामची चांगले । जडजीव उध्दरले नेणों किती ॥२॥

नाम निजनौका संताची संगती । हेची श्रीपती द्यावी मज ॥३॥

बंका म्हणे देवा पुरवावी आळी । देईन जीव बळी संता पायी ॥४॥