नकळे योग याग तपादि साधने ...

नकळे योग याग तपादि साधने । नेणेची लक्षण यांचे कांही ॥१॥

सुलभ सोपारे नाम आठवितां । न पडेची गुंता कर्म धर्म ॥२॥

विधिनिषेधाचें न घेवो ओझें । आणीक सहजें नकळे कांही ॥३॥

वंका म्हणे मज नामाचा आधार । उतरेन पार भवनदी ॥४॥