चोखा चोखट निर्मळ । तया अं...

चोखा चोखट निर्मळ । तया अंगी नाही मळ ॥१॥

चोखा सुखाचा सागर । चोखा भक्तिचा आगर ॥२॥

चोखा प्रेमाची माउली । चोखा कृपेची साउली ॥३॥

चोखा मनाचें मोहन । वंका घाली लोटांगण ॥४॥