प्रेमाचा पुतळा विठोबा साव...

प्रेमाचा पुतळा विठोबा सावळा । उभा तो देखिला भीमातटीं ॥१॥

कर कटावरी पाउलें साजिरीं । शंख चक्र करीं मिरवतसे ॥२॥

योगियांचा राणा गोपीमोहन कान्हा । भक्तिचा आंदणा घरोघरी ॥३॥

वंका म्हणे ऐसा कृपेचा कोवळा । पाळी भक्तलळा प्रेमासाठीं ॥४॥