शिक्षणाचा बाजार
आज प्रत्येकाला वाटतं मी शिकावं मोठं व्हावं जीवनात मोठ्या पदावर असावं आणि त्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतं.शाळा,महाविद्यालये यातून ज्ञान तर मिळतेच आणि जीवनाला आकारही येतो.पण आजकालची परिस्तिथी काहीशी वेगळीच झालेली आहे.
प्रत्येक पालकांना वाटत आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावं आणि त्याने यशस्वी व्हावं म्हणून पालक आपल्या मुलाला शाळेतील शिक्षणावर अविश्वास दाखवून खासगी शिकवणीला पाठवतात.पैसे देऊन शिकवणी घेतात.याची खरंच गरज आहे असं वाटतं का हो ? नाही ना मग ? का आपण शाळेतील शिक्षणावर विश्वास दाखवत नाही न खासगी शिकवणीला प्राधान्य देतो ? खासगी शिकवणी लावलेला मुलगा म्हणजे हुशार असतो आणि जो शाळॆतल शिक्षण घेतो तो हुशार नसतो का ? चांगलं शिक्षण पाहिजे असेल,परीक्षेत जास्त गुण मिळवायचे असेल,तर शिकवणी लावायलाच लागते असा पालक आणि विद्यार्थ्याचा गोड गैरसमज झालेला आहे.शाळेत असं शिक्षण मिळणं बंद झालं आहे का जे कि खासगी शिकवणीला लोक प्राधान्य देऊ लागतायं.