श्रीकृष्णाची आरती - कुंददंत मंदहासय नंदनंदना ...

कुंददंत मंदहासय नंदनंदना ।

पंचारति करितो तुज कंसकंदना ॥ धृ. ॥

गोपसख्या कोप टाक पाहि नतजनां ।

करी कृपा कृपावणवा ॥

बाळकृष्ण विठ्ठलास रक्षिं सज्जना ॥ कुंद दंत. ॥ १ ॥